Join us

Ankita Lokhande : विकीच्या जागी कोणी दुसरा असता तर..., सुशांतच्या मृत्यूनंतर अशी झाली होती अंकिताची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 13:29 IST

Ankita Lokhande : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे प्रचंड ट्रोल झाली होती. अंकिताने अनेकदा अनेकप्रसंगी यावर स्पष्टीकरणही दिलं. आता पुन्हा एकदा अंकिता व्यक्त झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर (Sushant Singh Rajput’s Death) अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) प्रचंड ट्रोल झाली होती. सोशल मीडियावर तिला नको ते ऐकायला मिळालं. अंकिताने अनेकदा अनेकप्रसंगी यावर स्पष्टीकरणही दिलं. पण तरिही ट्रोलर्सनी तिला ट्रोल करणं सुरुच ठेवलं. आता पुन्हा एकदा अंकिता यावर व्यक्त झाली आहे.

ट्रोलर्सनी आमचं जगणं कठीण केलं होतं...एका मुलाखतीत अंकिता सुशांतच्या मृत्यूनंतर तिच्या वाट्याला आलेल्या अनुभवांवर बोलली. ती म्हणाली, ‘माझं व सुशांतचं 2016 मध्ये ब्रेकअप झालं होतं. यानंतर दोन वर्षांनी 2018 साली विकी माझ्या आयुष्यात आला. पण सुशांतच्या मृत्यूनंतर लोकांनी मला व विकीला ट्रोल करायला सुरूवात केली. अंकिताने सुशांतला सोडायला नको होतं. विकी तू अंकिताला सोडून दे, असं काय काय ट्रोलर्स म्हणाले. विकीसाठी हे सगळं सहन करणं सोप्प नव्हतं. रोज नवनव्या कहाण्या समोर येत होत्या. प्रत्येकजण माझ्या व सुशांतबद्दल बोलत होता.

या काळात विकी मात्र शांतपणे माझ्या पाठीशी उभा होता. त्याने ना मला कोणत्या बाबतीत स्पष्टीकरण मागितलं, ना मला कधी काही बोलला. त्यानेच नव्हे तर त्याच्या कुटुंबानेही मला या काळात सपोर्ट केला. विकीच्या जागी दुसरा कुणी मुलगा असता तर इतकं ऐकल्यानंतर कदाचित मला सोडून गेला असता. पण विकी माझ्यासोबत होता. तो माझी ताकद बनला. आम्ही दोघंही धक्क्यात होतो आणि ट्रोलर्सनी आमचं जगणं मुश्किल केलं होतं. सहा महिने माझ्या व सुशांतबद्दल नको ते बोललं गेलं. मी सुशांतसाठी स्टँड घेतला कारण विकी माझ्यासोबत होता. सुशांतसाठी जे चांगलं आहे ते तू कर, असं म्हणत विकीने मला धीर दिला होता.’

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर अंकिता व सुशांत सिंग राजपूत प्रेमात पडले होते. अनेक वर्ष दोघं रिलेशनशिपमध्ये होते. अगदी दोघं लग्न करणार असं म्हटलं गेलं होतं. मात्र 2016 साली अचानक दोघांचं ब्रेक झालं होतं. 2020 मध्ये सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर अंकिताला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.   

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत