Join us

सुशांतच्या आठवणीत अंकिता झाली भावूक, म्हणाली- तुला जाऊन आज 2 महिने झाले सुशांत आणि..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 17:27 IST

सुशांतच्या आठवणीत भावूक झालेल्या अंकिता लोखंडे एक पोस्ट शेअर केली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला आता 2 महिने झाले आहेत. सुशांतच्या आठवणीत भावूक झालेल्या अंकिता लोखंडे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अंकिताने लिहिले, तुला जाऊन आज 2 महिने झाले सुशांत आणि मला माहिती आहे तू आता जिथे असशील तिथे आनंदी असशील. यानंतर अंकिताने फॅन्स एक विनंती करताना लिहिले, प्लीज 15 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सुशांतसाठी ठेवण्यात आलेल्या ग्लोबल प्रार्थना सभेमध्ये सहभागी व्हा.

अंकिताने आणखी एक फोटो शेअर केला आहेत ज्यात तिने हात जोडले आहेत. 

सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्ती हिने 15 ऑगस्टला सुशांतसाठी ग्लोबल प्रेयर मीटचे आयोजन केले आहे. अंकिता लोखंडेचा प्रियकर विक्की जैन यांनीही सर्वांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.विकीने लिहिले, ''आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुशांत सिंग राजपूतच्या प्रर्थना सभेला उपस्थित रहावे.'' याचसोबत विकीने  #cbiForssR आणि #JusticeForSushantSinghRaiput या हॅगटॅगचा देखील उपयोग केला आहे. विकीच्या या पोस्टवर अंकिता लोखंडेने देखील कमेंट केली आहे. 

या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी सुशांतच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. सुशांतच्या चाहत्यांकडून देखील वारंवार सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतअंकिता लोखंडे