Join us

See Pics: अखेर अंकिता लोखंडेने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेन्डने असे केले प्रपोज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 13:21 IST

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अंकिता व विकी जैन या दोघांच्या अफेअरच्या चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु आहेत. पण अंकिता यावर काहीही बोलायला तयार नव्हती. पण अखेर तिने तिचे नाते जगजाहिर केले आहे.

ठळक मुद्देअंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. होय, अंकिता व विकी जैन या दोघांच्या अफेअरच्या चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु आहेत. पण अंकिता यावर काहीही बोलायला तयार नव्हती. पण अखेर तिने तिचे नाते जगजाहिर केले आहे. बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबतचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून आपल्या प्रेमाची जाहिर कबुली दिली आहे.एका फोटोत विकी आपल्या गुडघ्यांवर बसून अंकिताला प्रपोज करतोय.  हा फोटो शेअर करत, ‘मी याबद्दल विचार करेल,’ असे कॅप्शन अंकिताने दिले आहे. अंकिताने पोस्ट केलेला हा फोटो पाहिल्यानंतर नव्याने काहीही सांगण्याची गरज नाही.अलीकडे एका मुलाखतीत अंकिताने ती प्रेमात असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. पण आता तिने थेटपणे या प्रेमाची कबुली दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान  विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली.  

विकी  जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.  सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता व विकी एकमेकांच्या जवळ आलेत. दोघांच्याही मित्रांना या रिलेशनशिपबद्दल ठाऊक होते.

अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे. भविष्यात या प्रेमाचा प्रवास कसा होतो, ते बघूच.

टॅग्स :अंकिता लोखंडे