Join us

Mr. & Mrs. Jain! लग्नानंतर पहिल्यांदा पतीसोबत दिसली अंकिता लोखंडे, दिल्या झक्कास पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 17:29 IST

Ankita Lokhande and Vicky Jain : लग्नानंतर आज अंकिताचा गृहप्रवेश झाला. यावेळी मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस जैन यांनी मीडियाला मस्तपैकी पोझ दिल्यात.

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत स्वत:ची एक खास ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे  (Ankita Lokhande ) गेल्या 14 डिसेंबरला लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत (Vicky Jain ) मोठ्या थाटामाटात तिचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाची अद्यापही चर्चा सुरू आहे. लग्नानंतर अंकिता छत्तीसगडची सून बनली आहे. होय, कारण विकी मूळचा छत्तीसगडचा आहे. विकी हा विलासपूरच्या एका मोठ्या कोळसा उद्योगपतीचा मुलगा. विकी स्वत:ही बिझनेसमॅन आहे. एका मित्राच्या माध्यमातून 3 वर्षांआधी विकी अंकिताला पहिल्यांदा भेटला आणि मग मैत्री झाली. पुढे प्रेम फुललं आणि आता दोघंही आयुष्यभराचे जोडीदार बनले. लग्नानंतर आज अंकिताचा गृहप्रवेश झाला. यावेळी मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस जैन यांनी मीडियाला मस्तपैकी पोझ दिल्यात. यावेळी अंकिता फारच सुंदर दिसत होती. अंकिता एकदम ट्रॅडिशनल अंदाजात मीडियासमोर आली होती.

यावेळी अंकिताने निळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती. तर विकीनं फिकट निळ्या रानगाचा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. अंकिता नेहमीप्रमाणे उत्साहात होती. दोघांनीही मीडियासमोर अनेक रोमॅन्टिक पोझ दिल्यात.

सध्या या जोडप्याचे हे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने दोघांचा व्हिडीओही शेअर केला आहे. लग्नाचं गिफ्ट म्हणून विकीने अंकिताला मालदीवमध्ये एक प्रायव्हेट व्हिला गिफ्ट दिल्याचे कळतंय. बॉलिवूड लाईफने एका युट्यूब चॅनलच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हिलाची किंमत 50 कोटी रूपये आहे. चर्चा खरी मानाल तर अंकितानेही पतीला एक खास गिफ्ट दिलं आहे. होय, अंकिताने म्हणे विकीसाठी एक प्रायव्हेट बोट खरेदी केली आहे. या पर्सनलाइज्ड बोटची किंमत 8 कोटी रूपये आहे. 

टॅग्स :अंकिता लोखंडे