अंकिता लोखंडे नुकतीच व्हॅलेन्टाईन डे साजरा करून परतली. व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यासाठी अंकिता व तिचा बॉयफ्रेन्ड विकी जैन शिमल्याला गेले होते. त्यांच्या ट्रिपचे अनेक व्हिडीओ व फोटो व्हायरल झाले होते. आता अंकिताने ‘गिला गिला...’ या गाण्यावरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि नेहमीप्रमाणे अंकिता ट्रोल होतेय.
अंकिताला हे डान्स व्हिडीओ शेअर करून आनंद मिळतो, हे तर तिच्या या कॅप्शनवरून स्पष्ट आहे. पण युजर्स मात्र तिच्या या व्हिडीओंना वैतागल्याचे कमेंट्सवरून दिसतेय.
तू वेडी झालीस... जणू जगात तू एकटीच मुलगी उरलीस, अशी वागते आहेस, असे एका युजरने तिच्या या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले. फिर आ गई यार ये पागल, असे लिहित एका युजरने अंकिताला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. वेडी आहे का ही? असा प्रश्न एका युजरने केला.गेल्या काही दिवसांपासून अंकिता सतत ट्रोल होतेय. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर तर अंकिता ट्रोल होण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी काळी अंकिता सुशांतच्या प्रेमात होती. त्याच्या मृत्यूनंतर अंकिता कोलमडली होती. पण आता ती यातून बाहेर आली आहे.
अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते.