नवे वर्ष अद्यापही सुरु व्हायचे आहे. पण नव वर्षाच्या आगमनासोबतचं या वर्षांत होऊ घातलेल्या लग्नांची चर्चा सुरु झाली आहे. होय, टीव्हीची लोकप्रीय अभिनेत्री आणि ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या आगामी चित्रपटातून बॉलिवूड पर्दापणास सज्ज असलेली अंकिता लोखंडे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आहे. कधी काळी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये राहिलेली अंकिता विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार आहे.
कालच अंकिताचा वाढदिवस झाला. या पार्टीतही विकी हजर होता. गेल्यावर्षी होळीच्या सेलिब्रेशन पार्टीमध्ये दोघे एकत्र आले होते. महत्वाची बाब म्हणजे दोघेही एकाच सोसायटीमध्ये राहतात .अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअप होण्यामागची वेगवेगळी कारणे सांगितली गेली. आता अंकिता पुन्हा आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे.