Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडने रिया चक्रवर्तीला मारला टोमणा?, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 18:58 IST

रिया चक्रवर्ती अंकिता लोखंडेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे आणि गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. एनसीबीच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी रिया चक्रवर्तीनेअंकिता लोखंडेला चांगलेच खडेबोल सुनावले होते. त्या त्या वेळी अंकिताने तिला चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. हल्लीच असे वृत्त समोर आले होते की, रिया चक्रवर्तीचे नाव बदनाम केल्याबद्दल अंकिता लोखंडेच्या विरोधात कायदेशीर एक्शन घेणार आहे. मात्र अद्याप या प्रकरणी असे कोणते वृत्त समोर आले नाही.

यादरम्यान आता अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर करत असे इशाऱ्या इशारामध्ये रिया चक्रवर्तीला टोमणा मारला आहे. अंकिता लोखंडेने ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत लिहिले की, देव नेहमी तिच्यासोबत राहिले आहेत...आणि ही कधीच नाही झुकणार. 

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रिया चक्रवर्तीने अंकिता लोखंडेला सुशांतची विधवा म्हटले होते. ज्यानंतर रिया चक्रवर्तीला लोकांनी चांगलेच ट्रोल केले होते. त्यावेळी सुशांतचा खास मित्र विकास गुप्तानेदेखील त्यावेळी अंकिताला सपोर्ट केला होता.

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची भेट एकता कपूरची लोकप्रिय मालिका पवित्र रिश्ताच्या सेटवर झाली होती.

या मालिकेदरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली होती. २०१६ साली सुशांत आणि अंकिता विभक्त झाले होते. त्यानंतर सुशांतचे नाव क्रिती सेनॉनसोबत जोडले गेले होते.

टॅग्स :अंकिता लोखंडेरिया चक्रवर्ती