Join us

अंकिता झाली भावूक- पाठविला इमोशनल मॅसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 15:52 IST

‘राबता’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत सिंह राजपूत आणि किर्ती सेनन यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे अंकिता भावूक झाली असून तिने इन्स्टाग्रामवर एक ...

‘राबता’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत सिंह राजपूत आणि किर्ती सेनन यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे अंकिता भावूक झाली असून तिने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल मॅसेल पोस्ट केला आहे. या मेसेजमध्ये तिने कुणाचे नाव लिहिले नाहीये, परंतु हा मेसेज तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडे इशारा करते.इमोशनल मेसेजमध्ये काय लिहिले अंकिताने...अंकिताने मेसेजमध्ये लिहिले, 'कोणतीही महिला पुरुषाचे पैसे सहज कार रायडिंग आणि मीनू आॅर्डरमध्ये खर्च करू शकते. परंतु महिला तिच असते, जी त्याच्या महत्वकांक्षा पूर्ण करण्यात त्याची मदत करते. जेव्हा तो खचून गेलेला असतो, तेव्हा त्याला सपोर्ट करते. त्याला धौर्य देऊन त्याला आयुष्यात यश मिळवून देण्यात हातभार लावते. त्याला सतत कॉम्पलीमेंट्स देते आणि जेव्हा तो निराश् होतो, तेव्हा दुर्लक्षित करत नाही.'