१९ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसले अंजली, राहुल अन् टीना! शाहरूख खानच करू शकतो ही कमाल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 13:17 IST
आजपासून ठीक महिनाभराने शाहरूख खानचा वाढदिवस आहे. पण शाहरूखने आपल्या चाहत्यांना आजपासूनच सेलिब्रेशनची संधी दिली आहे.
१९ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसले अंजली, राहुल अन् टीना! शाहरूख खानच करू शकतो ही कमाल!!
आजपासून ठीक महिनाभराने शाहरूख खानचा वाढदिवस आहे. पण शाहरूखने आपल्या चाहत्यांना आजपासूनच सेलिब्रेशनची संधी दिली आहे. आज सकाळी उठल्या-उठल्या शाहरूखने एक फोटो पोस्ट केला. होय, तब्बल दशकभरानंतर काजोल, राणी मुखर्जी व शाहरूख खान असे तिघेही या फोटोच्या निमित्ताने एका फ्रेममध्ये दिसले.‘कुछ कुछ होता है’मध्ये हे तिघे एकत्र दिसले होते. यानंतर १९ वर्षांनी हे तिघे पुन्हा एकत्र दिसले. खरे तर काजोल आणि राणी मुखर्जी दोघीही नात्याने बहीणी आहेत. पण यांच्या नात्यातील कडवेपणा सगळ्यांनाच ठाऊक आहे. अलीकडे एका पुरस्कार सोहळ्यात काजोल व राणी एकमेकींकडे दुर्लक्ष करताना दिसल्या होत्या. पण आज शाहरूखने काजोल व राणी या दोघींना एकमेकींबद्दलचा राग, द्वेष विसरायला भाग पाडले. शेवटी शाहरूखच काजोल व राणीला एकत्र आणू शकला. केवळ काजोल व राणीच नाही तर शाहरूखने करिश्मा कपूर, आलिया भट्ट आणि श्रीदेवी यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर करत आपल्या या सर्व लीडिंग लेडीजचे आभार मानलेत. ALSO READ : पाहा, शाहरूख खान व गौरी खानचे candid-moments !! शाहरूख व काजोलची जोडी प्रेक्षकांना सर्वाधिक भावली. ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’,‘कभी खुशी कभी गम’,‘माय नेम इज खान’,‘दिलवाले’ अशा अनेक चित्रपटात शाहरूख-काजोल एकत्र दिसले. राणी मुखर्जीसोबतही शाहरूखने अनेक चित्रपट केलेत. ‘कभी अलविदा न कहना’,‘वीर जारा’,‘पहेली’,‘कुछ कुछ होता है’ हे त्यापैकी काही चित्रपट. ‘दिल तो पागल है’ व ‘शक्ती’ या चित्रपटात शाहरूख करिश्मा कपूरसोबत दिसला. १९९६ मध्ये आलेल्या ‘आर्मी’मध्ये त्याची श्रीदेवीसोबत जोडी जमली. तर गतवर्षी आलेल्या ‘डिअर जिंदगी’मध्ये तो आलिया भट्टसोबत दिसला. या फोटोंमध्ये माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, करिना कपूर, कॅटरिना कैफसारखे अनेक चेहरे मीसिंग आहेत. या अभिनेत्रींसोबत शाहरूखने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या दोन दशकांपासून अधिक काळ बॉलिवूडवर राज करणाºया शाहरूखने बॉलिवूडच्या जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम केले आहे. म्हणूनच शाहरूखच्या यशात या सगळ्या अभिनेत्रींचाही वाटा आहेच. शाहरूखही हे चांगलेच जाणून आहे.