अनिल म्हणतो, करीना ही आधुनिक धाडसी महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 18:50 IST
आपली मुले सोनम, रिया आणि हर्षवर्धन ही स्वत:ची काळजी घेण्यास समर्थ आहेत. आजच्या आधुनिक काळातील धाडसी महिला म्हणून मी ...
अनिल म्हणतो, करीना ही आधुनिक धाडसी महिला
आपली मुले सोनम, रिया आणि हर्षवर्धन ही स्वत:ची काळजी घेण्यास समर्थ आहेत. आजच्या आधुनिक काळातील धाडसी महिला म्हणून मी करीना कपूरचे उदाहरण देईन, असे मत अभिनेता अनिल कपूरने व्यक्त केले.माझी मुले सर्वसामान्यांप्रमाणे वाढली पाहिजेत, साधे आयुष्य जगली पाहिजेत आणि त्यांनी त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मी काळजीवाहू वडील नाही. मला वाटते ज्यावेळी मुले लहान असतात, त्यावेळी पालकांनी काळजी केली पाहिजे. ती आता मोठी झाली आहेत. आपले निर्णय ते स्वत: घेऊ शकतात. खरं म्हणजे आम्ही आता त्यांच्यासोबत कायमस्वरुपी राहणार नाहीत. त्यांच्या स्वत:ची काळजी घेण्यास ते समर्थ आहेत आणि ते करत असल्याचे अनिलने सांगितले.आपली मुलगी सोनम हिने प्रसिद्धी मिळविली. त्यासबरोबर मुलगा हा राकेश ओमप्रकाश मेहराच्या ‘मिर्झ्या’ या चित्रपटातून पदार्पण करीत आहे‘, असेही अनिलने सांगितले.रियाने बॉलीवूड निर्माता म्हणून नाव कमावले आहे. आयशा आणि खूबसुरत चित्रपटाची ती सहनिर्माता असल्याचे अनिल म्हणाला.