Join us

अनिल कपूर, श्रीदेवी यांच्या ‘मिस्टर इंडिया’चा सीक्वल येणार; 'या' कलाकारांची लागेल वर्णी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2017 20:16 IST

८०च्या दशकात आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाºया अभिनेत्री श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या ‘मिस्टर इंडिया’ या ...

८०च्या दशकात आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाºया अभिनेत्री श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाचा ‘मिस्टर इंडिया-२’च्या शूटिंगला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. निर्माता बोनी कपूर यांच्या मिस्टर इंडिया या चित्रपटाची आजही जादू बघावयास मिळते. आता बोनी कपूर पुन्हा एकदा ‘मिस्टर इंडिया-२’चा सीक्वल प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. यासाठी त्यांनी प्लॅनिंग केली असल्याचे समजते. अनिल कपूर आणि श्रीदेवी या जोडीने त्याकाळी अनेक हिट चित्रपट दिले. श्रीदेवीचा तर असा जलवा होता की, पुरुष कलाकारांपेक्षा अधिक मानधन श्रीदेवी घेत असे. आजही बॉलिवूडमध्ये श्रीदेवीचा जलवा कायम असून, ‘इंग्लिश विंग्लिश’ आणि ‘मॉम’ या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयातील लय कायम ठेवली आहे. त्यामुळेच श्रीदेवीचे पती बोनी कपूर पुन्हा एकदा ‘मिस्टर इंडिया-२’ साठी प्लॅनिंग करीत आहेत. डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या माहितीनुसार, बोनी कपूर ‘मिस्टर इंडिया-२’ची निर्मिती करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. या चित्रपटात श्रीदेवी आणि अनिल कपूर ओरिजनल भूमिकेतच बघावयास मिळणार आहेत. मात्र त्यांच्याबरोबर चित्रपटात आणखी एक नवी जोडी असणार आहे. वास्तविक ती जोडी कोण असेल याचा निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. या चित्रपटाची निर्मिती करण्याचे आणखी एक कारण म्हणजे बोनी कपूर चित्रपटाची कथा पुढे घेऊन जाऊ इच्छितात. मात्र हे करीत असताना बोनी कपूर कुठल्याही प्रकारची घाई करू इच्छित नाहीत. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चागंल्या कथेच्या शोधात होते. परंतु आता आलेल्या माहितीनुसार त्यांचा शोध संपला असून, त्यांना हवी तशी कथा त्यांच्या हाती लागली आहे. विशेष म्हणजे ‘मिस्टर इंडिया-२’साठी बोनी कपूर नव्या दिग्दर्शकाचा शोधही घेत आहेत. कारण ‘मिस्टर इंडिया’चे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया-२’चे दिग्दर्शन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नव्या दिग्दर्शकाचा शोध सुरू असून, या रेसमध्ये राकेश ओमप्रकाश मेहरा, श्रीदेवीच्या ‘मॉम’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रवि उद्यवर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे हा चित्रपट कोणाला मिळेल हे बघणे मजेशीर असेल.