Join us

​अनिल कपूरने इंडस्ट्रीत यायच्या आधी केले आहे काम... हे काम करणे अभिनयापेक्षादेखील होते कठीण असे सांगतो अनिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 16:00 IST

अनिल कपूर हा बॉलिवूडमधील चॉकलेट हिरो मानला जातो. अनिलने वयाची साठी पार केली असली तरी तो आजही एखाद्या तरुण ...

अनिल कपूर हा बॉलिवूडमधील चॉकलेट हिरो मानला जातो. अनिलने वयाची साठी पार केली असली तरी तो आजही एखाद्या तरुण मुलासारखाच दिसतो. आजच्या तरुण अभिनेत्यांना लाजवेल अशी त्याच्यात एनर्जी आहे. त्यामुळे अनिल कपूरचे नेहमीच कौतुक केले जाते. अनिलचा रेस ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रेस या चित्रपटाच्या दोन्ही भागांमधील अनिलचे काम प्रेक्षकांना चांगलेच आवडले होते. त्यामुळे रेस ३ या चित्रपटात देखील त्याने बाजी मारली असणार याची त्याच्या चाहत्यांना खात्री आहे. अनिल कपूर आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अनिल कपूरला बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला. अनिल कपूरने हमारे तुम्हारे या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात संजीव कुमार, राखी, अमजद खान यांच्यासोबत अनिल कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटातील अनेक गाणी त्या काळात गाजली. या चित्रपटानंतर अनिल कपूरचा वो सात दिन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाने अनिलला खऱ्या अर्थाने सुपरस्टार बनवले. याआधी अनिल कपूरने सातवीत असताना एका चित्रपटात शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे नाव तू पायल मैं गीत असे होते. पण काही कारणांनी हा चित्रपट प्रदर्शितच होऊ शकला नाही.अनिल कपूर अनेक वर्षं अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याने पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये देखील प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला होता. पण एन्टरन्स एक्झाम फेल झाल्यामुळे अनिलला तिथे प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्याने रोशन तनेजा यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवले. पण काही केल्या त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळत नव्हती. त्यामुळे तो प्रोडक्शनमध्ये काम करत होता. एका चित्रपटाच्या प्रोडक्शन टीमसोबत काम करताना मिथुन चक्रवर्तीला झोपेतून उठवण्याचे रोजचे काम अनिलला दिले होते. मिथुनला त्याची झोप प्रिय असल्याने त्याला झोपेतून उठवणे हे काम खूपच कठीण होते असे अनिलने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. Also Read : अनिल कपूरने आपल्या यशाचे श्रेय दिले या अभिनेत्रीला