हॉलिवूड आणि फॅशन जगतातील 'मेट गाला' हा दरवर्षी होणारा एक मोठा कार्यक्रम आहे. यंदा २०२६ मध्येही हा कार्यक्रम सेलिब्रिटींच्या रेड कार्पेटवरील लूकमुळे चर्चेत आहे. यंदाच्या मेट गालामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी करण जोहर, मनीष मल्होत्रा आणि ईशा अंबानी सहभागी झाले होते. त्यांच्या हटके आणि डिझायनर आउटफिटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातच सोशल मीडियावर अभिनेता अनिल कपूरचा एक खास फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अनिल कपूर यांनी जे जॅकेट घातले आहे, त्यावर 'वेलकम' चित्रपटातील त्यांच्या गाजलेल्या 'मजनू भाई' या पात्राने काढलेले प्रसिद्ध पेंटिंग (गाढवावर बसलेला घोडा) दिसत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मात्र, खरी गोष्ट अशी आहे की, अनिल कपूर या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित नव्हते. हा फोटो त्यांच्या एका चाहत्याने AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरून एडिट केला आहे. अनिल कपूर यांनी स्वतः हा मजेशीर फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले आहे.
खरं तर, अनिल कपूर मेट गालामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाला नव्हता. मात्र, त्यानं सोशल मीडियावर एक AI एडिट केलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चाहत्यांनी त्यांच्या जॅकेटवर वेलकम चित्रपटातील 'मजनू भाई'च्या प्रसिद्ध पेंटिंगचं डिझाइन तयार केलं आहे. हा मजेशीर आणि हटके लूक पाहून चाहतेही खुश झाले असून, सोशल मीडियावर या फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.
अनिल कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो नुकतंच 'सुभेदार' या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्याच्या सोबत राधिका मदान मुख्य भूमिकेत होती. याशिवाय ते लवकरच 'अल्फा' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात आलिया भट आणि शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच, तो 'किंग' या चित्रपटातही झळकणार असून त्यात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि सुहाना खान महत्त्वाच्या भूमिकेत असतील.
Web Summary : A viral photo showed Anil Kapoor seemingly at Met Gala wearing a 'Majnu Bhai' jacket. Kapoor clarified it was an AI-edited fan creation, praising the creativity. He wasn't actually at the event but shared the amusing image online.
Web Summary : वायरल तस्वीर में अनिल कपूर मेट गाला में 'मजनू भाई' जैकेट पहने दिखे। कपूर ने स्पष्ट किया कि यह एआई-एडिटेड फैन क्रिएशन है, रचनात्मकता की प्रशंसा की। वह वास्तव में कार्यक्रम में नहीं थे, लेकिन मजेदार छवि ऑनलाइन साझा की।