Join us
Daily Top 2Weekly Top 5

उसकी की वो है ना...! अनिल कपूरने केली टायगर श्रॉफ व दिशा पटानीच्या नात्याची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 15:52 IST

होय, अनिल कपूरच्या तोंडून नकळत असे काही निघाले की, टायगर व दिशा दोघेही शॉक्ड होतील. 

ठळक मुद्दे‘एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फिटनेस आणि शानदार फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

टायगर श्रॉफ व दिशा पटानी दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र बोलायला तयार नाही. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, यापलीकडे दोघेही काहीही सांगत नाही. अर्थात टायगर व दिशा बोलत नाहीत, म्हणून लोकांना कळायचे थोडीच थांबणार. आता तर खुद्द अनिल कपूरनेही टायगर व दिशाच्या नात्याची ‘पोलखोल’ केलीये.होय, अनिल कपूर नुकताच कपिल शर्मा शोमध्ये दिसला. ‘एके विरूद्ध एके’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पोहोचलेल्या अनिलने धम्माल मस्ती केली. सोबत कपिलच्या मजेदार प्रश्नांना मजेदार उत्तरेही दिलीत. याचवेळी अनिल कपूरच्या तोंडून नकळत असे काही निघाले की, टायगर व दिशा दोघेही शॉक्ड होतील. 

तर कपिल शर्माने अनिलला त्याच्या फिटनेसबद्दल विचारले. तू स्वत:ला कसा फिट ठेवतोस, कोणाची डाएट फॉलो करतो,वगैरे वगैरे. यावर आधी अनिल कपूरने टायगरचे नाव घेतले. पण अचानक टायगरऐवजी त्याला दिशा आठवली.

‘मैंने अभी तक टायगर श्रॉफ के साथ काम नहीं किया हे, लेकीन उसकी वो है. मैंने फिट रहने के लिए उसकी डाएट चुरा ली,’ असे अनिल म्हणाला. आता टायगरची ‘वो’ कोण तर दिशा पटानी. अशापद्धतीने अनिलने दिशा व टायगरच्या नात्यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले.

‘एम.एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून प्रेक्षकांची मने जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फिटनेस आणि शानदार फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असलेली दिशा रोज नवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

टॅग्स :टायगर श्रॉफदिशा पाटनीअनिल कपूर