Join us  

क्या बात! ७० वर्षांपासून गावात नव्हता रस्ता, सोनू सूदपासून प्रेरणा घेऊन गावकऱ्यांनी स्वत: तयार केला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 4:50 PM

आता सोनू सूदच्या कामाने प्रभावित होऊन गावातील लोकांनी चक्क रस्ता तयार केला. आंध्र प्रदेशातील दोन गावात हा रोड तयार झालाय.

सोनू सूदने गेल्या काही महिन्यांत हजारो लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत केली आहे. लॉकडाऊनमध्ये प्रवासी मजूरांना घरी पोहोचवण्यापासून त्याने ही सुरूवात केली होती. त्यानंतर त्याने अनेक विद्यार्थी, गरीब लोकांची मदत केली. परदेशातूनही अनेकांना त्याने भारतात परत आणलं. आता त्याच्या कामाने प्रभावित होऊन गावातील लोकांनी चक्क रस्ता तयार केला. आंध्र प्रदेशातील दोन गावात हा रोड तयार झालाय.

कृष्णमूर्ती नावाच्या एका व्यक्तीने एका ट्विटमध्ये याची माहिती दिली. त्याने लिहिले की, 'सोनू सूदपासून प्रेरणा घेत आंध्रप्रदेशातील विजयानगरममधील दोन गावांनी आपल्या पायांवर स्वत: उभे राहण्याचा प्रयत्न केला. डोंगरात असलेल्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्याची गरज असते. १९४७ पासून स्थानिक प्रशासनाकडे अनेकदा रस्त्यासाठी अर्ज करण्यात आला. पण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आलं. अशात या गावातील प्रत्येक परिवाराने २ हजार रूपये दान केले आणि स्वत:च रस्ता तयार केला.

त्याने ट्विटमध्ये लिहिले की, 'आतापर्यंत चिंतामाला आणि कोडामा गावातील २५० परिवारांसाठी ट्रान्सपोर्टचं साधन म्हणून केवळ एक डोली होती. गर्भवती महिलांनाही इमरजन्सीमध्ये या डोलीवरच अवलंबून रहावं लागत होतं. हा फोटो दोन वर्षांआधीचा आहे जेव्हा एका महिलेला अशाप्रकारे १२ किलोमीटर दूर घेऊन जाण्यात आलं होतं.

या कामासाठी २० लाख रूपये जमा करण्यात आले. ज्यात दोन लोन आणि प्रत्येक परिवाराने दिलेल्या २ हजार रूपयांचा समावेश आहे. गावकऱ्यांनी ओडीसातून जेसीबी मशीन आणल्या आणि चार किलोमीटर रस्त्याच काम पूर्ण काम केलं. या गावातील लोक सोनू सूदच्या कामाने प्रभावित होते. आणि त्यांना जाणीव झाली होती की, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कुणाची वाट बघत बसण्याची गरज नाही. सोनू सूदही गावातील लोकांच्या कामाने खूश दिसला आणि त्याने ट्विट करून लिहिले की, माझा देश बदलत आहे.

हे पण वाचा :

रोजगारासोबत डोक्यावर छत...! सोनू सूदने मजुरांना दिले आणखी एक वचन

शिक्षणासाठी कायपण... मराठमोळ्या स्वप्नालीच्या मदतीसाठी सोनू सूद सरसावला

दिलदार स्टार! सोनू सूदने एकाला घेऊन दिली म्हैस, त्यानंतर जे लिहिलं ते वाचून तुम्हीही व्हाल भावूक!

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूडजरा हटकेप्रेरणादायक गोष्टी