Join us

​-आणि सलग दहा मिनिटं हुमसून हुमसून रडल्या शबाना आझमी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 14:34 IST

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमीच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि काही क्षणात त्या हुमसून हुमसून रडू लागल्या. अश्रू रोखावे कसे, हेच ...

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमीच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि काही क्षणात त्या हुमसून हुमसून रडू लागल्या. अश्रू रोखावे कसे, हेच त्यांना कळेना. यानंतर पुढची दहा मिनिटं त्या नुसत्या रडत होत्या. पण का? कारण होते, एक चित्रपट. होय, या चित्रपटाचे नाव आहे ‘पूर्णा’.अलीकडे अभिनेता राहुल बोस याने ‘पूर्णा’चे खास स्क्रीनिंग ठेवले होते. तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आलेली प्रत्येक व्यक्ती बाहेर आली, तेव्हा तिचे डोळे अश्रूंनी भिजलेले होते. अशी एकही व्यक्ती नव्हती जी, ‘पूर्णा’ पाहून रडली नव्हती. शबाना आझमी या सुद्धा त्यापैकीच एक़ ‘पूर्णा’ पाहून शबाना सलग दहा मिनिटं रडत होत्या. त्यांचे अश्रू थांबता थांबत नव्हते. खुद्द राहुल बोस याने याबद्दल सांगितलं.राहुल बोस म्हणाला, ‘पूर्णा’ हा भारताच्या एका मुलीची कथा आहे. तिने केवळ १३ वर्षांच्या वयात एवरेस्ट या महाशिखराला गवसणी घातली होती. केवळ ३७ दिवसांत आम्ही या चित्रपटाचे शूटींग संपवले. पूर्णा एवरेस्ट सर करते, तो सीन शूट करताना माझ्या स्वत:च्या डोळ्यांत देखील अश्रू होते. पूर्णा ही पूर्णा मलावथ या मुलीची सत्यकथा आहे. तिने एवरेस्ट सर केले तेव्हा तिच्या घरची स्थिती अतिशय हलाखीची होती. आदिवासी भागातून आलेल्या आणि गरिबी वाढलेल्या पूर्णाचे आई-वडिल अशिक्षित आहेत. ज्या गावाने विकासाचे नाव ही ऐकले नाही, अशा गावातून ती आली आहे. पण अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर केवळ वयाच्या १३ व्या वर्षी तिने जागतिक विक्रम नोंदवला.येत्या ३१ मार्चला हा चित्रपट रिलीज होतो आहे.