Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अन् चक्क ‘ग्रेट ग्रॅँड मस्ती’ ची टीम रडली !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 18:41 IST

अ‍ॅडल्ड कॉमेडी चित्रपट ‘ग्रेड ग्रंड मस्ती’ चित्रपटाची नुकतीच प्रेस कॉन्फरन्स झाली. या दरम्यान हा चित्रपट लीक झाल्याने रितेश, विवेक ...

अ‍ॅडल्ड कॉमेडी चित्रपट ‘ग्रेड ग्रंड मस्ती’ चित्रपटाची नुकतीच प्रेस कॉन्फरन्स झाली. या दरम्यान हा चित्रपट लीक झाल्याने रितेश, विवेक आणि आफताब तसेच उर्वशी रौतेलासह संपूर्ण टीमने दु:ख आणि नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर उर्वशी मीडियासमोर बोलताना ढसाढसा रडली. रडताना तिने, ‘कृपया पायरसी थांबवा’ अशी विनंती केली. जेणेकरुन यापूढे कुणा निर्माता आणि चित्रपटासोबत असे घडणार नाही. उर्वशी पूढे म्हणाली, की या सिनेमासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. संपूर्ण टीम सिनेमाच्या प्रमोशन आणि रिलीजसाठी खूप उत्साही होते. परंतु जेव्हा लोक आम्हाला येऊन म्हणाले, की आम्ही सिनेमा पाहिला. तुमचे काम आवडले. तेव्हा मला समजलेच नाही रडावे की हसावे.या पत्रकार परिषदेत स्टारकास्टशिवाय निमार्ती एकता कपूर आणि दिग्दर्शक इंदर कुमारसह संपूर्ण टीम उपस्थित होती. सर्वांनी सरकारला पायरसी थांबवण्याची मागणी केली. तसेच प्रेक्षकांना अपील केले, की पायरेटेड सिनेमे पाहू नका.