... आणि अशाप्रकारे आर. माधवनने केले 11 किलो वजन कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 12:18 IST
साला खडूस या चित्रपटासाठी माधवनने कित्येक किलो वजन वाढवले होते. या चित्रपटातील त्याची मस्क्युलर बॉ़डी सगळ्यांनाच आवडली होती. या ...
... आणि अशाप्रकारे आर. माधवनने केले 11 किलो वजन कमी
साला खडूस या चित्रपटासाठी माधवनने कित्येक किलो वजन वाढवले होते. या चित्रपटातील त्याची मस्क्युलर बॉ़डी सगळ्यांनाच आवडली होती. या चित्रपटातील माधवनच्या कामाचेदेखील सगळ्यांनी कौतुक केले होते. आता साला खडूस या चित्रपटानंतर माधवनचा एक तमिळ चित्रपट येत असून या चित्रपटासाठी तो कित्येक किलो वजन कमी करत आहे.माधवन विक्रम वेदा या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात तो एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी त्याला कित्येक किलो वजन कमी करण्याची गरज होती. त्यामुळे त्याने डाएट करून गेल्या काही महिन्यांत तब्बल 11 किलो वजन कमी केले आहे. माधवन यासाठी जिममध्ये कित्येक तास घाम गाळत नाहीये तर त्याने योग्य डाएट करून हे वजन कमी केले आहे. माधवन नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्याला गेला होता, तिथे माधवनचा हा नवा लूक पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याने वजन कमी केल्यापासून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. रहना है तेरे दिल मे या चित्रपटातील माधवन लोकांना पुन्हा पाहायला मिळत असल्याच्या कॉम्प्लिमेंट्स त्याला अनेकांकडून मिळत आहेत. याविषयी माधवन सांगतो, "विक्रम वेदा या चित्रपटातील भूमिकेसाठी माझे शरीर पिळदार असणे गरजेचे होते. साला खडूसच्यावेळी मी कित्येक किलो वजन वाढवले होते. त्यामुळे विक्रम वेदा या चित्रपटाची ऑफर आल्यावर मी वजन कमी करायला सुरुवात केली. यासाठी कोणताही व्यायाम न करता मी डाएट करायचे ठरवले. मी सध्या सायंकाळी सहानंतर काहीही खात नाही. तसेच दोन जेवणांमध्ये साडे पाच तासाचा तरी ब्रेक ठेवण्याचा प्रयत्न करतो.