Join us

- आणि सलमानही भारावला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 12:24 IST

जगाच्या पाठीवर सलमान खानचे असंख्य चाहते आहेत. एखाद्या शहरात चित्रीकरण सुरु झाले रे झाले की, लगेचच त्याचे चाहते त्याला ...

जगाच्या पाठीवर सलमान खानचे असंख्य चाहते आहेत. एखाद्या शहरात चित्रीकरण सुरु झाले रे झाले की, लगेचच त्याचे चाहते त्याला भेटण्यासाठी सेटवर गर्दी करतात. त्याची एक झलक पाहण्यासाठी किंवा त्याची स्वाक्षरी मिळवण्यासाठी धडपडांना दिसतात.सध्या मनालीत सलमान खान ‘ट्यूबलाईट’ चित्रपटाची शूटींग करतोय.अलीकडे मनालीतील शाळकरी मुलांना ‘बजरंगी भाईजान’ला भेटण्याची संधी मिळाली. मग काय, या मुलांमध्ये भाईचा स्वाक्षरी मिळवण्यासाठी एकच चढाओढ माजली.भाईनेही कुणालाही निराश न करता प्रत्येकाला  स्वाक्षरी दिली. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद पाहून खुद्द सलमानही भारावून गेला. चित्रपटाच्या टीमने हा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्याला कॅप्शन दिलेय,‘सलमान साईनिंग आॅटोग्राफ्स फॉर स्कूल चिल्ड्रेन.’