..आणि सायनाने इरफानला ४ वाजताच उठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 17:50 IST
बॉलिवूड अभिनेता इरफान खान आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल यांच्याबद्दल आम्ही बोलतोयं. इरफान आणि सायना अलीकडे एका जाहिरातीसाठी शूटींग ...
..आणि सायनाने इरफानला ४ वाजताच उठवले
बॉलिवूड अभिनेता इरफान खान आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल यांच्याबद्दल आम्ही बोलतोयं. इरफान आणि सायना अलीकडे एका जाहिरातीसाठी शूटींग करताना दिसले. सोमवारी झालेल्या या शूटदरम्यान इरफान व सायना या दोघांनीही धम्माल मस्ती केली. इरफानसोबत काम करण्याचा अनुभव सायनाने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला. इरफान सरांसोबत काम करताना धम्माल मज्जा आली, असे सायना म्हणाली.. सायनाच्या या टिष्ट्वटला इरफाननेही मस्त गमतीशीर उत्तर दिले. त्याने लिहिले...शूटींगसाठी माझ्या को-स्टारने मला पहाटे चारवाजताच झोपेतून जागे केले...आहे ना गंमत...