Join us
Daily Top 2Weekly Top 5

​...आणि राधिका त्या ‘विवस्त्र सीन’बद्दल बोलली !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 13:31 IST

राधिका आपटेचा नग्न असलेला ‘पार्च्ड’ या चित्रपटातील सीन लिक झाला होता.

राधिका आपटेचा नग्न असलेला ‘पार्च्ड’ या चित्रपटातील सीन लिक झाला होता. त्यामुळे चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली होती. या सीनच्या व्हायरल होण्याबद्दल राधिका आपटेला विचारले असता,  ‘या लीक झालेल्या सीनचा माझ्यावर काही परिणाम झालेला नाही. मी पूर्वी इतकीच कम्फर्ट आहे,’ असे राधिका म्हणाली.राधिकाच्या बाबतीत सीन लिक होण्याची ही दुसरी वेळ आहे.तिचा सहकलाकार अदिल हुसेन म्हणाला, " राधिका आपटेचा सेक्स सीन लीक झाला असेच का म्हणता ?  अदिल हुसेनचाही सेक्स सीन लीक झाला असे का म्हणत नाही ? राधिका म्हणाली, ‘ यावेळी माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. माझा पहिला सीन जेव्हा लीक झाला होता तेव्हा मी खूप चिडले होते. पण यावेळी नाही. मी खशाला रागवू ?  मी कन्फर्टेबल आहे. एका नामवंत पत्रकाराने मला सीन लिक झाल्याचे कळवले. मी त्यावर हसले, कारण मी काय केले आहे हे मला माहिती आहे.’