....आणि भूकंपातून मंदाना बचावली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 16:42 IST
गेल्या १५ तारखेला जपान भूकंपाने हादरला. ६.२ तीव्रतेच्या या भूकंपाने जपानमध्ये हाहाकार उडाला. ‘बिग बॉस ९’फेम मंदाना करिमी ही ...
....आणि भूकंपातून मंदाना बचावली!
गेल्या १५ तारखेला जपान भूकंपाने हादरला. ६.२ तीव्रतेच्या या भूकंपाने जपानमध्ये हाहाकार उडाला. ‘बिग बॉस ९’फेम मंदाना करिमी ही अभिनेत्री या भूकंपातून नशीबाने बजावली. सुट्या घालवण्यासाठी मंदानाने जपान ट्रिपचा प्लॅन बनवला होता. आई आणि भावासह मस्तपैकी एन्जॉय करायची मंदानाची इच्छा होती. मग काय, ठरल्यानुसार, ८ एप्रिलला मंदाना च तिचे कुटुंबीय जपानमध्ये पोहोचले. याठिकाणी दहा दिवस मस्तपैकी चिल्ड करण्याचे मंदानाच्या मनात होते. पण १५ एप्रिलला जपान भूकंपाने हादरला आणि मंदानाला परतीची वाट धरावी लागली. आपली ट्रीप मध्येच सोडत भूकंप झाला त्याचदिवशी मंदाना व तिचे कुटुंबीय जपानमधून परत निघाले. भूकंपाचा धक्का अनुभवणे खरोखरीचं प्रचंड भयावह होते, असे मंदानाने सांगितले. डिनरनंतर मी माझ्या रूममध्ये होती. याचदरम्यान दरवाजे आणि खिडक्या हलायला लागेल. मला काय झाले कळेना..मला वाटले शेजारच्या खोलीतून हा डिस्टर्ब करण्याचा आवाज येतोय. मी रिसेप्शनला फोन करणार तोच, माझ्या भावाने भूकंप झाल्याची माहिती मला दिली. ती भयावह रात्र आम्ही कशीबशी काढली आणि नंतर लगेच दोन दिवसांच्या उरलेल्या सुट्टयांचा प्लॅन रद्द करीत मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला,असे मंदाना म्हणाली. भूकंपामध्ये झालेल्या जीवित व वित्त हानीबद्दलही तिने हळहळ व्यक्त केली...