Join us

आणि दीपिका पादुकोणला आठवला आयुष्यातील 'तो' क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 13:32 IST

आयुष्यातले काही क्षण आपल्या घरात कायमचे घर करुन जातात. अनेक वर्ष सरल्यानंतही ते क्षण नेहमीच टवटवीत असतात. अशाच एका ...

आयुष्यातले काही क्षण आपल्या घरात कायमचे घर करुन जातात. अनेक वर्ष सरल्यानंतही ते क्षण नेहमीच टवटवीत असतात. अशाच एका रोमाँटिक क्षणाची आठवण अभिनेत्री दीपिका पादुकोणला झाली आहे. एका मुलाखतीत दरम्यान दीपिकाने आपल्या आयुष्यातील एक किस्सा शेअर केला. दीपिकाने करिअरच्या सुरुवातीपासून अनेकांच्या मनात आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर एक वेगळे स्थान निर्माण केले. मात्र अनेकांच्या ह्रदयाचा ठोका चुकवलेल्या दीपिकाच्या ह्रदयाचा ठोका ही कधी तरी चुकला होता. हे खुद्द दीपिकानेच सांगितेल आहे.  या खास रोमाँटिक क्षणाच्या आठवणी उलगडताना दीपिका म्हणाली, माझ्या आयुष्यातील सगळ्यात रोमाँटिक क्षणाविषयी बोलयाचे झाले तर तसे बरेच क्षण आहेत. पण फक्त एका क्षणाचा उल्लेख करायचा झाला तर, मला एका  आर्वजून आठवतो, ज्यावेळी मी एक वाद्य शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये ते वाद्या माझ्या घरी पोहोचले होते.”   दीपिकाने शेअर केलेला हा किस्सा साधरण 2012 मधला असल्याचे बोलले जाते आहे. यावेळी दीपिका आणि रणबीर एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले होते. त्यामुळे रणबीर कपूरनेचे तर दीपिकाला पियानो भेट तर दिला नसले ना ? असा प्रश्न अचानक अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. दीपिकाला ज्यावेळी हा पियानो भेट देण्यात आला तेव्हा हे दोघं एका चित्रपटाचं चित्रीकरण करत होते, अशी चर्चा आहे. दीपिकाने आपल्या आयुष्यातील रोमाँटिक क्षण जरुर शेअर केला मात्र हे रोमाँटिक गिफ्ट तिला नक्की दिले कोणी या व्यक्तीते नावं तिने गुलदस्त्यातच ठेवले. कालांतराने दीपिका आणि रणबीर कपूर यांचे ब्रेकअप झाले. दीपिकाच्या आयुष्यार रणवीर सिंगची एंट्री झाली तर रणवीरच्या आयुष्यात कॅटरिना कैफची. मात्र रणवीर आणि कॅटरिनाचे नातं फार काळ टिकले नाही.  ALSO READ :  ‘पद्मावती’च्या कलाकारांनी घेतली तगडी फी! जाणून घ्या किती?लवकरच दीपिका पादुकोण आपल्याला पद्मावती चित्रपटात राणी पद्मावतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिकासह यात रणवीर सिंग आणि शाहिद कपूर ही झळकणार आहेत. 1 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.