...आणि गर्दीही म्हणाली,‘काला चश्मा जचता हैं’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 10:00 IST
सध्या बॉलीवूडच्या धमाकेदार हिंदी गाण्यांनी तरूणाईला अक्षरश: वेड लावले आहे. त्यातले सध्या तरूणाईच्या ओठावर असलेले गाणे म्हणजे ‘काला चश्मा ...
...आणि गर्दीही म्हणाली,‘काला चश्मा जचता हैं’
सध्या बॉलीवूडच्या धमाकेदार हिंदी गाण्यांनी तरूणाईला अक्षरश: वेड लावले आहे. त्यातले सध्या तरूणाईच्या ओठावर असलेले गाणे म्हणजे ‘काला चश्मा जचता हैं...’‘बार बार देखो’ चित्रपटातील या गाण्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांनी केलेला डान्स सर्वांनाच मस्त नाचायला लावणारा आहे. नुकतेच सिद्धार्थ आणि कॅटरिना हे जयपूरला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेले होते.तेव्हा मेट्रो स्टेशनवर या दोघांना पाहताच एकदम गर्दी झाली. सर्वांनी ‘काला चश्मा’वर डान्स करण्यास सिद-कॅटला आग्रह केला. आणि मग काय ? पाहता पाहता सर्व गर्दीच ‘काला चश्मा जचता हैं’ असे म्हणत मस्तपैकी डान्स करू लागली. यावेळी सिद्धार्थ आणि कॅटरिना अतिशय हॉट दिसत होते.