अन् बिग बी यांनी मानला किंग खानचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 04:46 IST
बिग बी अमिताभ यांचे आजारपण हा त्यांच्या तमाम चाहत्यांसाठी धडकी भरवणारा क्षण असतो. गेल्या काही दिवसांपासून अमिताभ आजारी होते. ...
अन् बिग बी यांनी मानला किंग खानचा सल्ला
बिग बी अमिताभ यांचे आजारपण हा त्यांच्या तमाम चाहत्यांसाठी धडकी भरवणारा क्षण असतो. गेल्या काही दिवसांपासून अमिताभ आजारी होते. पण आताश: ते आजारपणातून बाहेर आले आहेत. औषधांनी गुण आला,असे तुम्ही म्हणाल. औषधांनी गुण आला हो! पण या औषधांसोबतच किंगखान शाहरूख खान यांच्या एका सल्लयानेही बिग बी यांना लवकर बरे केले. आजारपण लवकर दूर होण्यासाठी रात्री भरपूर झोप गरजेची असते, तेव्हा भरपूर झोप घ्या, असा सल्ला शाहरूखने अमिताभ यांना दिला होता. अमिताभ यांनी हा सल्ला अगदी लगेच मनावर घेतला आणि त्यांना त्याचा लाभही झाला. खुद्द अमिताभ यांनी टिष्ट्वटरवर ही माहिती दिली. चांगली झोप आजारपण दूर करण्यासाठी मदतगार ठरते, असे शाहरूख मला एकदा म्हणाला होता. आज मला स्वस्थ वाटतयं...असे टिष्ट्वट अमिताभ यांनी केले.T 2165 – ShahRukh once mentioned a good nights' sleep cures many ailments, body mind all ..TRUE. I feel cured today! .— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 5, 2016