And…ACTION: शाहिद कपूरचा भाऊ इशान बनला हिरो; शूटींग सुरु!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 11:50 IST
शाहिद कपूरचा लहान भाऊ इशान खट्टर अॅक्टिंग डेब्यू करणार, करणार अशी बºयाच दिवसांपासून चर्चा होती. अखेर तो दिवस आलाच. ...
And…ACTION: शाहिद कपूरचा भाऊ इशान बनला हिरो; शूटींग सुरु!
शाहिद कपूरचा लहान भाऊ इशान खट्टर अॅक्टिंग डेब्यू करणार, करणार अशी बºयाच दिवसांपासून चर्चा होती. अखेर तो दिवस आलाच. इराणचे सुप्रसिद्ध फिल्ममेकर माजिद मजीदी यांच्या चित्रपटातून इशान अॅक्टिंग डेब्यू करणार आहे. विशेष म्हणजे, ही केवळ चर्चा नाही तर अगदी पक्की बातमी आहे. कारण आजपासून मुंबईत या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले.माजिद मजीदी गेल्या आॅगस्टपासून मुंबईत तळ ठोकून बसले आहेत. याचे कारण म्हणजे, चित्रपटाची पूर्वतयारी. होय, बहिण-भावाच्या नात्यावर आधारित एक चित्रपट माजिद घेऊन येत आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी माजिद यांनी नीलीमा अजीम आणि राजेश खट्टर यांचा मुलगा तसेच शाहिद कपूरचा भाऊ इशान याच्याशी संपर्क साधला होता. हा प्रस्ताव इशानने स्वीकारला आहे. म्हणजेच माजिद यांच्या चित्रपटात इशानभावाची भूमिका साकारताना दिसणारर आहे. या चित्रपटाचे नाव ‘फ्लोटिंग गार्डन्स’ असल्याचे मानले जात होते. पण आता याचे नाव बदलून ‘बियॉन्ड द क्लाऊड’ असे ठेवण्यात आल्याचे कळतेय. माजिदच्या या चित्रपटासाठी दीपिका पादुकोण हिने सुद्धा तिच्या डी-ग्लॅम अवतारात लूक टेस्ट दिली होती. त्यामध्ये ती मुंबईच्या धोबी घाटावर झोपडपट्टीत राहणाºया मुलीच्या रुपात दिसली होती.अर्थात अद्याप तिचे नाव फायनल झालेले नाही. हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा चित्रपट तयार केला जाणार असून नंतर तो फारसी भाषेत डब केला जाणार आहे.Also Read: शाहिद कपूरचा भाऊ करणार का दीपिका पदुकोणसोबत डेब्यू?Shocking !! ‘या’ दीपिकाला तुम्ही ओळखू शकाल?चार वर्षांपूर्वी माजिदी यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र, अनेक कारणांमुळे त्याला विलंब होत गेला. पण अखेर आजचा दिवस उजाळला. इशानने या चित्रपटासाठी पहिला टेक दिला. आता इशानच्या बहिणीच्या रूपात कुणाची वर्णी लागतेय, ते बघूच!!