- आणि अभिषेक पायलट नसलेल्या विमानात अडकला!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2016 14:12 IST
अभिषेक बच्चन सध्या बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण आज तो twitterवर अचानक सक्रीय झाला. कारण, विना पायलटचे विमान. होय, अभिषेक ...
- आणि अभिषेक पायलट नसलेल्या विमानात अडकला!!
अभिषेक बच्चन सध्या बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. पण आज तो twitterवर अचानक सक्रीय झाला. कारण, विना पायलटचे विमान. होय, अभिषेक ज्या विमानात बसला होता, त्या विमानाचा वैमानिकच गायब होता. पण घाबरू नका, हे विमान हवेत नाही तर जमिनीवर होते. अभिषेकला चेन्नईला पोहोचायचे होते. यासाठी त्याने जेट एअरवेजच्या विमान घेतले. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर तो विमानात जावून बसला. हळूहळू सर्व प्रवासीही विमानात चढले. पण वेळ होऊनही विमान जागचे हलेना. मग अभिषेकला कळले की, विमानाचा वैमानिकच गायब आहे. आधी तर अभिषेकने संयमाने घेतले. पण हळूहळू त्याचा संयमाचा बांध तुटला आणि त्याची जागा संतापाने घेतली. मग काय, एका पाठोपाठ एक असे अनेक tweets करून अभिषेकने आपल्या संतापाला वाट करून दिली. प्रवाशांना विलंब झाला तर विमान कंपन्या त्यांना आत घेत नाहीत. आता विमानाला विलंब झालाय, तर प्रवाशांकडे त्यातून उतरण्याचा पर्याय आहे का? असे एक ना अनेक tweets अभिषेकने केले. पावणे अकरा वाजतापासून पावणे बारापर्यंत अभिषेकला विमानात असेच ताटकळत बसावे लागले. अखेर एका तासानंतर वैमानिक आला आणि अभिषेकच्या विमानाने उड्डाण भरले. मग काय, कदाचित माझी प्रार्थना ऐकली गेली...विमान जागचे हलले...असे शेवटचे tweet अभिषेकने केले.आता अभिषेक चेन्नईला कुठल्या कारणाने गेला, हे अभिषेकने एकाही tweetमधून सांगितले नाही. कदाचित तसे कारणही नसावे. कारण सेलिब्रिटी कारणाशिवाय काहीच करत नाहीत. प्रमोशन आणि प्रसिद्धीची गरज नसेल सेलिब्रिटी काहीही सांगत नाही. अभिषेकही याला अपवाद नाहीच. }}}}