२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर २' चित्रपटातून अनन्या पांडेनेबॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ती अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. अनन्या पांडे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनन्या हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अनन्या तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अनन्याच्या कोणाला डेट करत याच्या सुद्धा चर्चा असतात. अनेक सेलिब्रिटींसोबत अनन्या हिचं नाव जोडलं जातं. अशातच अनन्यानं रुमर्ड बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट केली आहे.
अनन्याने तिच्या इन्स्टाग्रामवर वॉकर ब्लँकोचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यामध्ये वॉकर ब्लँको बाल्कनीत बसून हसताना दिसत आहे. निळ्या रंगाचा टी-शर्ट, जीन्स आणि कॅप अशा साध्या लूकमध्ये तो अतिशय हँडसम दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना अनन्याने लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, वॉकर, तू सर्वोत्तम आहेस!".
अंबानींच्या लग्नापासून सुरू झाली प्रेमस्टोरी?अनन्या आणि वॉकरच्या डेटिंगच्या अफवा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापासून सुरू झाल्या होत्या. या शाही लग्नात हे दोघे एकत्र दिसले होते. एका रोमँटिक गाण्यावर या जोडीने एकत्र डान्सही केला होता, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
कोण आहे हा वॉकर ब्लँको?वॉकर ब्लँको हा मूळचा अमेरिकेतील शिकागोचा रहिवासी आहे. तो एक माजी मॉडेल असून सध्या तो गुजरातमधील जामनगर येथे अंबानी कुटुंबाच्या 'वनतारा'मध्ये काम करतो.
अनन्याचे आगामी प्रोजेक्ट्सकामाबद्दल बोलायचे झाले तर, अनन्या लवकरच लक्ष्यसोबत "चांद मेरा दिल" या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तिच्या "कॉल मी बे" या लोकप्रिय वेब सीरिजचा दुसरा सीझनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Summary : Ananya Panday wished Walker Blanco a happy birthday, fueling dating rumors that began at the Ambani wedding. Blanco, a former model, works at the Ambani's 'Vantara' in Jamnagar. Ananya will soon be seen in "Chand Mera Dil" and the second season of "Call Me Bae."
Web Summary : अनन्या पांडे ने वॉकर ब्लैंको को जन्मदिन की बधाई दी, जिससे अंबानी शादी में शुरू हुई डेटिंग की अफवाहें और तेज हो गईं। ब्लैंको, एक पूर्व मॉडल, जामनगर में अंबानी के 'वनतारा' में काम करते हैं। अनन्या जल्द ही "चांद मेरा दिल" और "कॉल मी बे" के दूसरे सीजन में दिखाई देंगी।