Join us

लोक म्हणायचे फ्लॅटस्क्रिन आहेस तू, बॉडी शेमिंगची शिकार ठरली होती चंकी पांडेची लेक अनन्या पांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 15:06 IST

अनन्या पांडे आज बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

बॉलिवूडमधील बरेच सेलेब्रिटी बऱ्याचदा ट्रोल होतात तर कधी ते बॉडी शेमिंगचे शिकार होतात. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचे म्हणणे आहे की इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी ती बॉडी शेमिंगचा बळी ठरली आहे. त्याच्या शरीर यष्टिची चेष्टा करायची आणि अश्लिल कमेंट् करायचे. या सर्व गोष्टींचा अनन्याच्या मनावर इतका परिणाम झाला होता की ती तिचा आत्मविश्वास गमावून बसली होती.

तेव्हा इंडस्ट्रीचा भाग नव्हती अनन्या चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी अनन्या पांडेने २०१० मध्ये 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण यापूर्वीही ती चर्चेत होती. सोशल मीडियावर तिची चर्चा होती. एका नव्या मुलाखतीत अनन्याने त्या दिवसांचा उल्लेख केला आहे जेव्हा ती पहिल्यांदा ट्रोल झाली होती.

बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार अनन्या म्हणाली, 'मला ती तारीख आणि वेळ नीट आठवत नाही. त्या दिवसांत  माझ्या आईवडिलांसोबत एक फोटो असायचा. त्यावेळी मी अभिनेत्री नव्हती. मी आई-वडिलांसोबत बाहेर जायचे. मी खूप बारीक होते. लोक माझी थट्टा करायचे. ते म्हणायचे की तू मुलासारखी दिसतेस, तू  फ्लॅटस्क्रीन आहेस. अशा आणखीन वाईट कमेंट्स माझ्यावर केल्या जायच्या.

अनन्या पुढे म्हणाली, 'या गोष्टींमुळे मला दु: ख व्हायचे, कारण जेव्हा तुम्ही मोठे होते असता, स्वतःवर प्रेम करायला शिकत असता. तुमच्यात आत्मविश्वास जागरुक होत असतो. पण जेव्हा अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती तुम्हाला मागे खेचते तेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवण्यास संकोच करता. '

वर्ष 2019 मध्येच अनन्याने इंटरनेटवर ट्रोलिंगबाबत 'सो पॉझिटिव्ह' हे अभिनयान सुरू केले आहे. एका मुलाखतीत अनन्या याबद्दल बोलताना म्हणाली, 'सोशल मीडियावरील लोकांचे वागणे काळानुसार बदलले आहे. आता जेव्हा मी माझ्या पेजवर नेगेटीव्ह कमेंट्स बघते, तेव्हा त्याखाली एक पॉझिटीव्ह कमेंट देखील दिसते.  

टॅग्स :अनन्या पांडे