Ananya Panday Lips Surgery: अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अनन्या हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अनन्या तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सध्या अनन्याचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर अनन्यानं लीप फिलर सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे.
अनन्याने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या टॅन्ड लूकमध्ये पाउट करताना दिसत आहे. या दरम्यान, ती कारमध्ये बसलेली आहे. अनन्याचे जुने फोटो आणि आता तिनं शेअर केलेले फोटो लक्षपुर्वक पाहिले तर तिच्या ओठांचा आकार बदलेला दिसून येत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी 'ती दिशा पटानीसारखी दिसत आहे' अशा कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने विचारलं, "फिलर्स??? बोटॉक्स??? का?". कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी फिट आणि परफेक्ट दिसण्यासाठी वेगवेगळ्या सर्जरी करुन घेत असतात. आतापर्यंत अनेक कलाकारांनी ओठांवर, नाकांवर सर्जरी करुन त्यांचा लूक बदलला आहेत.