Join us

अनंत अंबानीने शाहरुख खानच्या हातात दिला चक्क साप, Video पाहून चाहते झाले नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 09:56 IST

ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांच्या ग्रँड बर्थडे पार्टीत घडला प्रकार

रिलायन्सचे संचालक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश असलेले उद्योजक मुकेश अंबानी सध्या बॉलिवूड कलाकारांसोबत अनेकदा दिसतात. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरु केलेल्या अनेक इव्हेंट्ससाठी बॉलिवूडकर हजर असतात. कालच मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. अनेक बॉलिवूड कलाकारांनी या ग्रँड बर्थडे पार्टीला हजेरी लावली. यावेळी अनंत अंबानींनी (Anant Ambani) शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) केलेल्या एका प्रँकचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ईशा अंबानी गेल्या वर्षी कृष्णा आणि आदित्य या जुळ्या मुलांना जन्म दिला. काल त्यांचा पहिला वाढदिवस जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये साजरा करण्यात आला. या बर्थडे पार्टीत करण जोहर, शाहरुख खान, कतरिना कैफ, हार्दिक पांड्या, कियारा अडवाणीसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी पार्टीत शाहरुख खान ब्लॅक आऊटफिटमध्ये अतिशय कॅज्युअल लुकमध्ये दिसला. दरम्यान मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानीने शाहरुखच्या हातात चक्क एक साप दिला. इतकंच नाही तर एका माणसाने किंग खानच्या गळ्यात दुसरा साप ठेवला. हे बघून अंबानी कुटुंबाची होणारी धाकटी सून राधिका मर्चंटही हसायला लागली. दोन साप अंगावर घेऊनही शाहरुख खान मात्र एकदम रिलॅक्स दिसत होता. आता हे साप खरे होते की खोटे हे स्पष्ट झालं नाही. मात्र त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. शाहरुख खानच्या एका फॅन पेजने हा व्हिडिओ अपलोड केला आहे.

हा व्हिडिओ पाहून शाहरुख खानचे चाहते मात्र नाराज झालेत. 'हे बरोबर नाही शाहरुखसोबत तुम्ही असा व्यवहार करु शकत नाही,' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.' हा भयानक व्हिडिओ हटवा यात शाहरुखला जोकर सारखं ट्रीट करण्यात आलंय.'अशीही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :शाहरुख खानमुकेश अंबानीमुंबई