बॉलिवूड अभिनेते जितेंद्र (Jitendra) आज ७ एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करत आहेत. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र इंडस्ट्रीत त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातात. जितेंद्र यांची फिल्मी कारकीर्द खूप यशस्वी ठरली. जंपिंग जॅक या नावाने प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याने अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ७ एप्रिल, १९४२ रोजी अमृतसर येथे जन्मलेल्या जितेंद्र यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती. जितेंद्र यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यही खूप चर्चेत आले होते. जितेंद्र हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या प्रेमात होते, दोघे लग्नदेखील करणार होते, पण असं काही घडलं की हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्नगाठ बांधली.
जितेंद्र यांनी ७० च्या दशकात फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. गीत गाए पत्थरों ने हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांच्या चित्रपटांची इंडस्ट्रीमध्ये खूप चर्चा होती. तसेच त्यांची लव्ह लाईफ देखील चर्चेचा विषय ठरला होता. शोभा कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असूनही त्यांनी हेमा मालिनींना डेट करायला सुरुवात केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघे लग्न करणार होते, पण धर्मेंद्र यांच्यामुळे लग्न होऊ शकले नाही.