Join us

या हॉट अभिनेत्रीचे फोटो पाहाल तर मलायका आणि सनीला देखील विसरून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 14:39 IST

ही अभिनेत्री तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नेहमीच हॉट फोटो पोस्ट करत असते.

ठळक मुद्देअमायराच्या ताज्या फोटोंनी आता सोशल मीडियावर कमाल केलीय. तिचा सोशल मीडियावरील एक फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या फोटोत तिने बिकनी घातली असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय.

अभिनेत्री अमायरा दस्तूर काही महिन्यांपूर्वी संजय दत्तच्या ‘प्रस्थानम’ या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नसला तरी या चित्रपटातील अमायराच्या लूकचे चांगलेच कौतुक झाले होते. अमायराचा या चित्रपटातील अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. 

अमायराच्या ताज्या फोटोंनी आता सोशल मीडियावर कमाल केलीय. तिचा सोशल मीडियावरील एक फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या फोटोत तिने बिकनी घातली असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय. हा फोटो पोस्ट करून केवळ तीन दिवस झाले असले तरी या फोटोला तीन दिवसांत 1 लाख 80 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या फोटोतील तिच्या बोल्ड अंदाजाचीच चर्चा सगळीकडे रंगली आहे. अमायराच्या या फोटोने इंटरनेटवर आग लावली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

अमायरा नेहमीच तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर हॉट फोटो पोस्ट करत असते. तिचे फोटो तिच्या चाहत्यांना नेहमीच आवडतात. अमायराला सोशल मीडियावर खूपच चांगले फॅन फॉलोव्हिंग असून १७ लाखाहून अधिक लोक तिला सोशल मीडियावर फॉलो करतात.  

अमायराने २०१३ मध्ये इश्क या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिने अनेक तामिळ चित्रपटातही काम केले आहे.

काही महिन्यांपूर्वी अमायराने मीटू मोहिमेवर बोलताना एक खळबळजनक खुलासा केला होता. पुरूष आणि महिला दोघांच्याही लैंगिक शोषणाची शिकार ठरल्याचा शॉकिंग खुलासा तिने केला होता. ‘मी पुरूष आणि महिला दोघांच्याही लैंगिक शोषणाची शिकार ठरले. पण त्यांची नावे जगजाहीर करून त्यांना जगासमोर उघडे करण्याची हिंमत माझ्यात नाही. ते इंडस्ट्रीतील शक्तीशाली व्यक्ती आहेत. मी कास्टिंग काऊचला बळी पडले नाही. पण बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्री दोन्ही ठिकाणी मी अत्याचार सहन केला. एक दिवस मी नक्कीच याचा खुलासा करेल. पण जोपर्यंत मी स्वत:ला सुरक्षित समजत नाही, तोपर्यंत मी कुणाकडेही बोट दाखवणार नाही, असे अमायरा म्हणाली होती.

टॅग्स :बॉलिवूड