Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दबंग3’बद्दल बोलली एमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2016 17:23 IST

एमी जॅक्सनच्या हाती सलमान खानचा ‘दबंग3’ लागलाय, अशी बातमी आहे. नुकतीच एमीने यावर चुप्पी तोडली. ‘दबंग’च्या दोन्ही सीरिजमध्ये सोनाक्षी ...

एमी जॅक्सनच्या हाती सलमान खानचा ‘दबंग3’ लागलाय, अशी बातमी आहे. नुकतीच एमीने यावर चुप्पी तोडली. ‘दबंग’च्या दोन्ही सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा सलमानच्या अपोझिट दिसली होती. ‘दबंग3’मध्येही  सोनाक्षी दिसणार आहे. पण सोनाक्षीसोबत आणखी एक हिरोईन यात आहे. ही हिरोईन असू शकते एमी जॅक्सन. होय, सलमानचा पर्सनल स्टाइलिस्ट ऐश्ले रिबेलो याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करीत एमी  ‘दबंग3’ची हिरोईन असू शकते, असे संकेत दिले. या फोटोत सलमान, वलूशा डिसूजा आणि एमी जॅक्सन दिसत आहे. शनिवारची रात्र,  ‘दबंग3’च्या संभाव्य अभिनेत्रींसोबत...असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले होते. आता खरे -खोटे काय, म्हणून याबाबत थेट एमीलाच विचारण्यात आले.  ‘दबंग3’ साईन केलास का? असा प्रश्न तिला करण्यात आला. पण एमीने अगदी शिताफीने हा प्रश्न टाळला. दुर्दैवाने मी ‘किक’मध्ये काम करू शकले नव्हते. ही माझ्यासाठी खूप मोठी प्रक्रिया होती. पण आता मला त्याचा जराही पश्चाताप नाही. आता मी बॉलिवूडमध्ये चांगलीच रूळली आहे. सलमानसोबत काम करून मला चांगलेच वाटेल. कारण तो लीजेंड आहे, असे एमी म्हणाली. म्हणजेच एमी थेट काही बोलली नाही. पण  ‘दबंग3’बाबत एमी किती एक्साईटेड आहे, हे लपून राहिलेले नाहीच...सो, बेस्ट लक एमी!!