एमी जॅक्सनचा फोन झाला हॅक...मग घडले असे काही...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 17:04 IST
अभिनेत्री एमी जॅक्सन सायबर क्राईमची शिकार ठरली आहे. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आता नेमके एमीसोबत काय ...
एमी जॅक्सनचा फोन झाला हॅक...मग घडले असे काही...!!
अभिनेत्री एमी जॅक्सन सायबर क्राईमची शिकार ठरली आहे. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आता नेमके एमीसोबत काय घडले, ते जाणून घेऊन यात. एमीचा प्रायव्हेट फोन हॅक झाला. हॅकरने एमीच्या मोबाईलमधील काही प्रायव्हेट फोटो लीक केलेत. यानंतर एमीने पोलिसात जाणेच पसंत केले. लंडन आणि भारतात मुंबई पोलिसांकडे तिने याप्रकरणी तक्रार दाखल केली.एमीने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, शूटींगसाठी चेन्नईला जायचे असल्याने काही दिवसांपूर्वी एमी मुंबईत आली होती. येथून तिला कनेक्टिंग फ्लाईट घ्यायची होती. मुंबईत ती एका मोबाईल स्टोरमध्ये गेली. एमीच्या मते, याच दुकानात तिचा फोन हॅक झाला. काही दिवस एमीला याची कल्पना नव्हती. पण अचानक बेस्ट फ्रेन्डसोबतच्या डिनरचे काही प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक झालेले पाहून एमी घाबरली. यानंतर कुठे आपला फोन हॅक झाल्याचे एमीच्या लक्षात आले आणि तिने सायबर सेलकडे तक्रार करणेच योग्य समजले.ALSO READ : एमी जॅक्सनचा हा बोल्ड अॅण्ड सेक्सी अंदाज तुम्ही पाहिला का?‘दबंग ३’मध्ये सलमान खानसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्रीएमी सध्या ‘2.0’ या चित्रपटात बिझी आहे. यात ती सुपरस्टार रजनीकांतसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ४०० कोटी रूपयांचा बजेट असलेल्या या चित्रपटाची ९० टक्के शूटींग झाली आहे. ‘एक दिवाना था’ या चित्रपटापासून एमीने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. पण ‘सिंह इज ब्लिंग’ या चित्रपटाने एमीला खरी ओळख दिली. या चित्रपटात एमीने गँगस्टरच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात एमीने बरेच अॅक्शन सीन्सही दिले होते. अक्षयच्या तोडीने अॅक्शन करणारी एमी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. या चित्रपटात एमीसोबत लारा दत्ताही दिसली होती.