Join us

​अमृताला खटकला साराचा शॉर्ट टॉप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 16:54 IST

अभिनेत्री आणि सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंग सध्या मुलीवर नाराज असल्याचे कळते. आम्ही बोलतोय, ते सारा सिंगबद्दल. ...

अभिनेत्री आणि सैफ अली खानची एक्स वाईफ अमृता सिंग सध्या मुलीवर नाराज असल्याचे कळते. आम्ही बोलतोय, ते सारा सिंगबद्दल. अमृता सारावर नाराज असल्याचे कळतेय. आता या नाराजीमागचे कारण तुम्हाला ऐकायचेयं. तर आम्ही तुम्हाला सांगतो. एका माहितीनुसार, सारा करिनाच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे अमृताचे मत आहे. आता तुम्ही म्हणाल हे कशावरून. तर साराच्या अलीकडे बदललेल्या फॅशन स्टाईलवरून. अलीकडे साराने जीन्सवर एक शॉर्ट टॉप कॅरी केला होता. नेमके हेच टॉप साराच्या मम्माला अर्थात अमृताला खटकले. साराला शॉर्ट ड्रेसमध्ये असे अंगप्रदर्शन करण्याची गरज नाही, असे अमृताचे मत आहे. अमृता नेहमी लाँग कुर्ती आणि चुडीदारमध्ये दिसते. सारानेही अशाचप्रकारे ड्रेसअप करावा, अशी अमृताची इच्छा आहे. एकंदर काय, तर साराने सावत्र आईचे कुठल्याही प्रकारचे अनुकरण करू नये, अशी अमृता यांची इच्छा आहे.