Join us

अमरीश पुरींनी सर्वांसमोर स्मिता पाटील यांच्या लगावलेली कानाखाली, मग अभिनेत्रीनं केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:06 IST

Amrish Puri And Smita Patil : अमरीश पुरी यांनी एकदा सर्वांसमोर स्मिता पाटील यांच्या कानशीलात लगावली होती. त्यांनीच एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता.

अमरीश पुरी (Amrish Puri) हे बॉलिवूडमधून लोकप्रिय खलनायक होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये ग्रे शेड भूमिकेतून प्रचंड दहशत पसरवली होती. आता ते या जगात नसले तरी त्यांचा दमदार अभिनय आणि आयकॉनिक संवाद त्यांना त्यांच्या चाहत्यांच्या आठवणीत जिवंत ठेवतात. पण तुम्हाला माहित आहे का की, अमरीश पुरी यांनी एकदा सर्वांसमोर स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या कानशीलात लगावली होती. त्यांनी स्वतः या संदर्भातील किस्सा सांगितला होता.

शूटिंगदरम्यान अमरीश पुरी यांनी एकदा सेटवर सर्वांसमोर स्मिता पाटील यांना थापड मारली होती. त्यांनीच एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. अमरीश पुरी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते त्यांच्या चित्रपटातील भूमिकेतील एक मनोरंजक किस्सा सांगताना दिसत आहेत.

अमरीश पुरींनी सांगितला किस्सा

अमरीश पुरी व्हिडीओमध्ये असे म्हणताना दिसत आहेत की, चित्रपटात स्मिता पाटील यांच्यासोबत त्यांचा एक सीन होता, त्या सीनमध्ये ते स्मिता यांना निघून जाण्यास सांगतात आणि त्यानंतर त्यांना अमरीश पुरी यांच्यावर रागवायचे होते. या सीन दरम्यान त्यांना थापडही मारावी लागली. अमरीश पुरींनी पुढे सांगितले की, या सीनचे चित्रीकरण करण्यापूर्वी त्यांच्या मनात एक कल्पना आली आणि त्यांनी दिग्दर्शक श्याम बेनेगल यांना विचारले की, रिअलमध्ये स्मिता पाटील यांच्या कानशीलात लगावू शकतो का? श्याम बेनेगल काही काळ गप्प राहिले, त्यांना वाटले की यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. त्यांना भीती होती की जर त्यांना (स्मिता) थापड लागली तर त्या शूटिंगमध्येच निघून जातील. पण, ते शेवटी ते तयार झाले.

अमरीश यांनी थापड लगावल्यानंतर अभिनेत्रीने केलं असं काहीस्मिता पाटील यांना अमरीश पुरी यांचा प्लान माहित नव्हता. हा सीन सुरू असताना त्यांनी अचानक स्मिता पाटील यांना थापड मारली. त्यावर अभिनेत्रीची प्रतिक्रिया पूर्णपणे नैसर्गिक होती. अमरीश पुरी यांच्या म्हणण्यानुसार, सीन संपल्यानंतर, स्मिता पाटील त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या मागे धावत असल्याचे पाहून संपूर्ण युनिट हसले होते. अमरीश पुरी यांनी स्मिता पाटील यांचे कौतुक करत ती एक नैसर्गिक अभिनेत्री आणि अतिशय व्यावसायिक असल्याचे सांगितले होते. 

टॅग्स :अमरिश पुरीस्मिता पाटील