Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमोल गुप्ते यांचा 'हा' व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 12:36 IST

निवडणुकीचे बिगुलग वाजले आहे. सगळीकडेच सध्या निवडणुकीचे वारे वाहतायेत. उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

ठळक मुद्देअमोल गुप्तेंनी लोकांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सांगतायेत

निवडणुकीचे बिगुलग वाजले आहे. सगळीकडेच सध्या निवडणुकीचे वारे वाहतायेत. उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. जसजसे लोकसभेच्या निवडणुका जवळ येतायेत तसेच सेलिब्रेटीही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जनतेमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचे काम करित आहेत. तसेच लोकांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सांगतायेत.

दिग्दर्शक आणि अभिनेता अमोल गुप्ते यांनी ही अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीआच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावायला सांगितले आहे. प्रत्येकाला घरातून बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केले आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन घरी आराम करु नका बाहेर पडून मतदान करा. 

अमोल गुप्ते हे नाव  'तारे जमीं पर' या सिनेमामुळे घराघरात पोहोचले. तारे जमीं पर या सिनेमाचे  लेखक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले होते. खुल्या विचारांचा, संवेदनशील दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लहान मुलांसाठी ते अभिनयाच्या कार्यशाळा ही घेत असतात. 

निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर बॉलिवूड आणि राजकारण यांचे जवळचे नातं आहे. अनेक कलाकार अभिनयानंतर राजकारणाकडे वळले आहे. यावर्षी उर्मिला मातोंडकर आणि प्रकाश राज यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.  

टॅग्स :अमोल गुप्तेनिवडणूक