Join us

अम्मीचा सल्लू-लूलियाच्या लग्नाला होकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 19:37 IST

अम्मी सलमा खान हिच्या आग्रहाखातर बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान लग्न करणार असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. रोमानियन गर्लफे्रन्ड लूलिया ...

अम्मी सलमा खान हिच्या आग्रहाखातर बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान लग्न करणार असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. रोमानियन गर्लफे्रन्ड लूलिया वंतूर हिच्यासोबत सलमान लग्नगाठीत अडकणार असल्याची चर्चा आहे. ही बातमी किती खरी नि किती खोटी, हे नेमके सांगता येणार नाही. पण बुधवारी रात्री सलमान, लूलिया व सलमा खान  हे तिघेही मुंबई विमानतळावर एकत्र दिसल्याने सलमानच्या लग्नाच्या चर्चेला आणखीच जोर चढला. यापूर्वी जेव्हाकेव्हा सलमान व लूलिया एकत्र आले तेव्हा ते मीडियाच्या कॅमेºयांपासून स्वत:चा बचाव करताना दिसले. पण बुधवारी रात्री दोघेही कॅमेºयासमोर कंफर्टेबल दिसले. सलमान व लूलिया वेगवेगळ्या कारमधून एअरपोर्टवरून बाहेर पडले. सलमान एकटा तर लूलिया सलमानची आई व बहिणीसोबत दुसºया गाडीत बसली. यादरम्यान लूलियाने सलमानच्या आईचा हात पकडला होता. काही दिवसांपूर्वी ‘सूल्तान’च्या सेटवर सलमान व लूलिया एकत्र दिसले होते. यावेळी त्यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली होती.