Join us

​अमिताभ म्हणतात, बच्चन कुटुंबिय सर्वसामान्यांसारखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 17:19 IST

बच्चन कुटुंबियांभोवती नेहमीच चर्चेचे वलय असते. मात्र अमिताभ बच्चन यांच्या अनुसार त्यांचे कुटुंबिय इतरांपेक्षा वेगळे नाही.पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ...

बच्चन कुटुंबियांभोवती नेहमीच चर्चेचे वलय असते. मात्र अमिताभ बच्चन यांच्या अनुसार त्यांचे कुटुंबिय इतरांपेक्षा वेगळे नाही.पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपले कुटुंब, मुलगा अभिषेक, नात, पनामा पेपर्स वाद यांच्याविषयी आपले मत व्यक्त केले. राम गोपाल वर्मा यांच्या सरकार ३ बाबतही ते बोलले.प्रश्न: आम्ही असे पाहतो की, कोणत्याही कार्यक्रमात बच्चन कुटुंबीय एकत्र असते. अगदी अभिषेक अथवा ऐश्वर्याचा चित्रपट असो. तुम्ही कुटुंबियाच्या कामाचे कसे विश्लेषण कराल?अमिताभ: आम्ही सर्वसामान्य आहोत. आम्ही स्वत:ला सामान्यच मानतो. इतर कुटुंबियांप्रमाणेच आम्ही चित्रपटाविषयी चर्चा करतो.प्रश्न: आपल्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांमध्ये अभिषेकने यशस्वीरित्या अभिनयात यश मिळविले. तुमच्यासाठी तो अभिनेता प्रथम आहे की, उद्योजक?अमिताभ: तो माझ्यासाठी पहिल्यांदा मुलगा आहे आणि शेवटी अभिनेता. माझ्याअनुसार त्याने विविध क्षेत्रात आकर्षण निर्माण केले आणि सिद्धता निर्माण केली.प्रश्न: तुमच्या कामाविषयी जयांचे काय म्हणणे आहे? त्या प्रभावित आहेत?अमिताभ: काही वेळा.... प्रत्येक वेळा नाही !प्रश्न: तुमची नात नव्य नवेली नंदा ही चित्रपटात येणार असल्याचे सांगण्यात येते. ती चित्रपट क्षेत्रात येत आहे?अमिताभ: ही बातमी चुकीची आहे. ती आपल्या पुढील अभ्यासात व्यग्र आहे. ती नुकतीच शाळेतून ग्रॅज्युएट झालीय.प्रश्न: सरकार ३ साठी तुम्ही रामगोपाल वर्मासोबत काम करीत आहात. सध्या ते अडचणीत असताना, ते यातून बाहेर येतील, असे तुम्हाला वाटते का?अमिताभ: चित्रपट क्षेत्रात प्रत्येकाच्या बाबतीत अशी घसरण होत असते. बागेत खेळणारी मुले ही याबाबतीतले चांगले उदाहरण आहे. जेव्हा मुल धावत असताना खाली पडतात, त्यावेळी ते जमिनीत गायब होत नाहीत. रामगोपाल वर्मा ही अत्यंत टॅलेंटेड व्यक्ती आहे. त्याने अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. त्याच्यासोबत काम करताना मला, नेहमी आनंद होतो. प्रश्न: पनामा पेपर्सच्या वेळी तुमचे नाव आले. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात असे वाद तुम्ही कसे पचविता?अमिताभ: आम्ही असे परिणाम अनुभवले आहे. मला वाटते कोणताही निर्माता, दिग्दर्शक किंवा प्रॉडक्शन हाऊस जे मला जाहिरातीसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घेतात किंवा मालिकेत घेतात ते अधिक चांगल्या पद्धतीने या प्रश्नाची उत्तरे देऊ शकतील. हे झाले व्यावसायिक. वैयक्तिकबाबतीत मी पहिल्यांदा विचार करतो, याबाबत खुलासा करावा अथवा नाही. जर मला कोणत्याही संस्थेकडून याबाबतीत नोटीस आली तर आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो.मी वरील प्रश्नांबाबत तीन वेळा माध्यमांकडून (वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे) खुलासे दिले आहेत. भारतीय सरकारकडून मिळालेली नोटीस आणि समन्सला मी स्वत: उत्तरे दिली आहेत. मी त्यांना नेहमीच सहकार्य करीत आलेलो आहे.माझ्या नावाचा कदाचित गैरवापर झाला असण्याची शक्यता आणि या प्रकरणातील नकार याबाबत माझे सार्वजनिक उत्तर मी दिले आहे. माझी सर्व मालमत्ता, बँक अकाऊंटस् ही माझ्या टॅक्सच्या पैशातून आहे. भारत सरकारच्या एलआरएस स्कीमच्या अनुसार आहे. आयकर खात्याकडे मी दरवर्षी टॅक्स जमा करीत असतो.