Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभने काढली फ्लिंटॉफची ‘विकेट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 14:17 IST

अमिताभ बच्चन यांना उगीच ‘बॉलिवूडचा शहंशाह’ नाही म्हणत. कोणीही असू देत, सिनियर बच्चनसमोर सर्वांचीच बोलती बंद होते. याची प्रचिती ...

अमिताभ बच्चन यांना उगीच ‘बॉलिवूडचा शहंशाह’ नाही म्हणत. कोणीही असू देत, सिनियर बच्चनसमोर सर्वांचीच बोलती बंद होते. याची प्रचिती इंग्लंडचा पूर्व क्रिकेटर अँड्य्रू फ्लिंटॉफला आली.सध्या ट्विटरवर फ्लिंटॉफ आणि अमिताभ यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली आहे. टी-20 क्रिकेट विश्वकपदरम्यान सामान्य चाहत्यांचे विरोधी संघाच्या समर्थकांशी प्रत्यक्षात आणि सोशल मीडियावर हमरीतुमरी चालूच असते. टीम इंडियाचे खंदे समर्थक बच्चन यांचे क्रिकेट प्रेम तर जगजाहीर आहे. मग कोणी जर आपल्या टीमच्या खेळाडूला कमी लेखत असेल तर, बच्चन कसे शांत राहणार?याची सुरूवात झाली ती फ्लिंटॉफच्या एका खोडसाळ ट्विटने. आॅस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामान्या विराट कोहलीच्या असामान्य खेळीनंतर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असताना फ्लिंटॉफने ट्विट केले की, अशा प्रकारे जर का कोहली खेळत राहिला तर तो इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूटला गाठू शकतो.}}}}सध्याच्या परिस्थितीमध्ये क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणजे विराट. फ्लिंटॉफ त्याला कमी लेखतोय हे पाहून बच्चनसाहेबांनी खणखणीत ट्विट करून त्याचा समाचार घेतला. त्यांनी लिहले, कोण आहे रुट? जड से उखाड देंगे ‘रुट’ को.बिग बींचा हा वार फ्लिंटॉफच्या चांगलाच जिव्हारी लागला. मग त्याने बिग बींनाच टार्गेट केले. तमाम भारतीयांची खिल्ली उडवत फ्लिंटॉफने ट्विट केले की, कोण आहेत बच्चन?यानंतर तर फ्लिंटॉफवर जगभरातून ट्विटचा भडिमार झाला. पण सर्वात सरस ठरले ते आपले ‘सर रविंद्र जडेजा’! त्याने फ्लिंटॉफला उत्तर देत लिहिले की, ‘बेटा फ्लिंटॉफ रिश्ते में तो वो तुम्हारे बाप लगते है...नाम है शहंशाह’!’ आणि सोबत ट्विटर फॉलोवर्सची तुलना दाखवणारा फोटो पण पोस्ट केला. बिग बींचे 20.1 मिलयन फॉलोवर्स आहेत तर बिचाऱ्या फ्लिंटॉफचे केवळ 1.8 मिलियन.}}}}बरं एवढी नाचक्की होऊनही फ्लिंटॉफ सुधारला नाही. सेमीफायनमध्ये वेस्ट इंडिजकडून टीम इंडिया पराभूत झाल्यावर जखमेवर मीठ चोळणारे त्याने ट्विट केले की, आम्ही तर फायनलमध्ये पोहचलो. बच्चनसाहेब तुमचे तिकीट मला द्या, मी जाऊन पाहतो मॅच.आता हे म्हणजे खूप झाले! फायनलमध्ये इंग्लंड पराभूत झाल्यावर बिग बींनी अखेर फ्लिंटॉफला क्लिन बोल्ड केले. त्यांनी ट्विट केले की, मित्रा फ्लिंटॉफ, मॅच सोड. आधी इंग्लंडला परत जाण्याचे तिकिट बुक कर. उखाड के रख दिया जड से..!}}}}आता यावर तो काय म्हणणार. मान गए बच्चनसाहब आपको!}}}}