Join us

​‘पल्लू लटके...’ गाण्यावर अशी थिरकली अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन! व्हिडिओ व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 11:04 IST

महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नातेचं नाहीच, असे मात्र मुळीच नाही.

महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नातेचं नाहीच, असे मात्र मुळीच नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरी श्वेता कायम चर्चेत असते. आताही श्वेता चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत श्वेता ‘शादी में जरूर आना’ या चित्रपटातील ‘पल्लू लटके’ या गाण्यावर डान्स करताना दिसतेय.  फॅशन डिझाईनर संदीप खोसला याची भाची सौदामिनी मट्टूच्या वेडिंग रिसेप्शनचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओतील श्वेताचा अंदाज निश्चितपणे पाहण्यासारखा आहे.  या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडचे अनेक बडे स्टार हजर होते. असे असताना डान्स तर बनतोच. श्वेताशिवाय तिची आई व अभिनेत्री जया बच्चन यांनीही या पार्टीत ठेका धरला. करण जोहर यानेही धम्माल डान्स केला. अमृता सिंग व सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिनेही आपल्या डान्सने सगळ्यांना घायाळ केले.ALSO READ : ऐश्वर्या राय बच्चनने नणंद श्वेता बच्चनमुळे ‘मिस’ केली फराह खानची बर्थ डे पार्टी? ४४ वर्र्षांची श्वेता ही अमिताभ व जया यांची मोठी मुलगी आहे. १९९७ मध्ये तिने निखील नंदासोबत लग्न केले. तिला नव्या नवेली नंदा आणि अगस्त्या नंदा अशी दोन मुले आहेत. लवकरच श्वेताने लिहिलेले पहिले पुस्तक ‘पॅराडाईज टॉवर्स’ प्रकाशित होतेय. खुद्द श्वेताने याबद्दल घोषणा केली होती. एक दिवस सकाळी उठले अन् माझ्या मनात हे पुस्तक लिहिण्याचा विचार आला. हे माझ्यासाठी अगदी स्वाभाविक आहे. माझे आजोबा साहित्यिक होते. मला साहित्यिकांचा वारसा लाभला आहे. लहानपणापासून लिहिण्या-वाचण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करण्यात आले आहे, असे श्वेताने सांगितले होते.