Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनच्या जन्माच्यावेळी केलेल्या एका चुकीमुळे जाणार होती अनेकांची नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 13:03 IST

अभिषेकचा जन्म झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांना प्रचंड आनंद झाला होता. त्यांनी आनंदाच्या भरात एक मोठी चूक केली होती.

ठळक मुद्देअमिताभ यांनी सगळ्यांना वाईनची बॉटल भेट म्हणून दिली हे त्या रुग्णालयाच्या वरिष्ठांना कळल्यानंतर ते प्रचंड चिडले होते. कामावर असताना डॉक्टर, नर्स, वॉडबॉय यांनी दारू प्यायली असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा वरिष्ठांनी विचार केला होता.

अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनचा जन्म 5 फेब्रुवारी 1976 ला मुंबईत झाला. अभिषेक हा अमिताभ यांचा प्रचंड लाडका असून त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येते. एवढेच नव्हे तर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले आहे. 'पा' या चित्रपटात तर अभिषेकने चक्क अमिताभ यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. अमिताभ आणि अभिषेक यांची केमिस्ट्री खूपच छान असून ती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. 

अभिषेकचा जन्म झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांना प्रचंड आनंद झाला होता. त्यांनी आनंदाच्या भरात एक मोठी चूक केली होती. या चुकीमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाऊ शकल्या असता... अमिताभ बच्चन यांनीच ही गोष्ट नुकत्याच एका मुलाखतीत सांगितली आहे. अमिताभ यांनी सांगितले आहे की, अभिषेक यांच्या जन्मानंतर त्यांना प्रचंड आनंद झाला होता. त्यांना काय करायचे आणि काही नाही हेच कळत नव्हते. त्यांनी त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या सगळ्यांना, त्यांच्या सगळ्या ड्रायव्हर्सना पैसे आणि मिठाई भेटवस्तू म्हणून दिल्या होत्या. एवढेच नव्हे तर अभिषेकचा ज्या रुग्णालयात जन्म झाला, त्या रुग्णालयातील सगळ्यांना त्यांनी वाईनची बॉटल दिली होती.

 

अमिताभ यांनी सगळ्यांना वाईनची बॉटल भेट म्हणून दिली हे त्या रुग्णालयाच्या वरिष्ठांना कळल्यानंतर ते प्रचंड चिडले होते. कामावर असताना डॉक्टर, नर्स, वॉडबॉय यांनी दारू प्यायली असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा वरिष्ठांनी विचार केला होता. अखेरीस ही गोष्ट अमिताभ यांना कळल्यानंतर त्यांनी त्यांची चूक मान्य केली आणि जाऊन वरिष्ठांची माफी मागितली होती. अमिताभ यांनी त्यावेळी हस्तक्षेप केला नसता तर त्या रुग्णालयातील अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली असती.

अमिताभ आणि अभिषेक यांना चित्रपटात एकत्र पाहायला त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडते. त्यांच्या आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या कधी भेटीस येणार याची ते नेहमीच आतुरतेने वाट पाहात असतात. 'कजरा रे' या गाण्यात तर प्रेक्षकांना अभिषेक, अमिताभ आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना एकत्र पाहायला मिळाले होते.  

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चन