Join us
Daily Top 2Weekly Top 5

महानायक अमिताभ बच्चन यांच्या नातीचा ‘या’ स्टारकिडसोबतचा फोटो होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 15:54 IST

महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन यांच्यातील लिंकअप्सच्या चर्चा सातत्याने समोर येत ...

महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन यांच्यातील लिंकअप्सच्या चर्चा सातत्याने समोर येत आहेत. मात्र आता नव्या वेगळ्याच स्टारकिडसोबत बघावयास मिळाल्याने एका नव्या चर्चेला उधाण आले आहे. सोशल मीडियावर नव्याचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका स्टारकिडसोबत बघावयास मिळत आहे. दोघांचा फोटो समोर आल्यानंतर पुन्हा एकदा नव्याच्या अफेअरच्या चर्चा समोर आल्या आहेत. फोटोत दोघांमधील चांगली बॉन्डिंग दिसत आहे. आता तुम्ही विचार करीत असाल की, हा स्टारकिड कोण आहे?तर हा स्टारकिड कॉमेडियन, अभिनेता आणि होस्ट जावेद जाफरीचा मुलगा मीजान आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये दोघांनी खूपच कोजी पोज दिली आहे. जवळ-जवळ बसलेल्या दोघांनीही एकसारखाच ड्रेस घातलेला आहे. दरम्यान, या दोघांच्या डेटिंगच्या बातम्या आता समोर येत असून, दोघांमधील बॉन्डिंग चर्चेत आली आहे. खरं तर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र बघावयास मिळाले असे अजिबात नाही, तर हे दोघे नेहमीच एकत्र पार्ट्यांमध्ये बघावयास मिळत असतात. दरम्यान, नव्याचे नाव अगोदर शाहरुखच्या मोठ्या मुलाशी जोडले गेले होते. त्यानंतर नव्या हॅरी गिलिसला डेट करीत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. आता तिचे नाव जावेद जाफरीच्या मुलासोबत जोडले जात आहे. दरम्यान, जावेद जाफरीचा मुलगा मीजान लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सध्या त्याच्या डेब्यूवरून तो चांगलाच चर्चेत आहे.