Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितू नंदा यांच्या प्रार्थनासभेला अमिताभ बच्चन झाले भावुक, पाहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:44 IST

रितू नंदा यांची शोकसभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्देअमिताभ रितू यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, रितू या खूप चांगल्या आई, मुलगी, बहीण, सासू होत्या. अमिताभ यावेळी चांगलेच भावुक झाले होते. त्यांचे हे बोल ऐकताच जया आणि श्वेता बच्चन यांना देखील त्यांचे अश्रू आवरले नाहीत. 

दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांची मुलगी तसेच अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिच्या सासूबाई रितू नंदा यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. त्या दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. अभिनेता रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा देत रितू नंदा यांच्या निधनाची बातमी मीडियात जाहीर केली होती. सोबत नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर यांनीही सोशल मीडियाद्वारे रितू नंदा यांना श्रद्धांजली वाहिली होती.

रितू नंदा यांची शोकसभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला कपूर कुटुंबियांतील मंडळींसोबतच बच्चन कुटुंबियातील सगळेच उपस्थित होते. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन सगळेच नंदा कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले होते. श्वेताची मुले नव्या आणि अगस्त्या यांचे ते सांत्वन करताना दिसले. तसेच ऋषी कपूर, नीतू सिंग कपूर, रणधीर कपूर, बबिता यांनी सगळ्यांनी रितू यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

रितू यांच्या शोकसभेचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यात अमिताभ चांगलेच भावुक झाले असल्याचे दिसून येत आहेत.

अमिताभ रितू यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, रितू या खूप चांगल्या आई, मुलगी, बहीण, सासू होत्या. अमिताभ यावेळी चांगलेच भावुक झाले होते. त्यांचे हे बोल ऐकताच जया आणि श्वेता बच्चन यांना देखील त्यांचे अश्रू आवरले नाहीत. 

ऋषी कपूर यांनी त्यांच्या बहिणीच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, दोनच आठवड्यात रितू आणि रंजन नंदा यांच्या लग्नाला 51 वर्षं होणार होते. हा दिवस साजरा करण्याचे त्यांनी ठरवले होते. तसेच या व्हिडिओत अंकित बत्रा जीना यहाँ मरना यहाँ हे राज कपूर यांचे प्रसिद्ध गाणे गाताना दिसत आहे. 

 

टॅग्स :अमिताभ बच्चनऋषी कपूररणधीर कपूरनितू सिंग