Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांना नाही मिळणार डी.लिट उपाधी; राज्यपालांनीच यादीतून वगळले नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 14:29 IST

महानायक अमिताभ बच्चन यांचे वय ७५ वर्ष इतके असतानाही ते सध्या बºयाचशा प्रोजेक्ट्सवर काम करीत आहेत. आज त्यांचा इंडस्ट्रीत ...

महानायक अमिताभ बच्चन यांचे वय ७५ वर्ष इतके असतानाही ते सध्या बºयाचशा प्रोजेक्ट्सवर काम करीत आहेत. आज त्यांचा इंडस्ट्रीत जेवढा आदर केला जातो, तेवढाच आदर त्यांचा चाहत्यांमध्ये केला जातो. त्यामुळेच त्यांच्या कारकिर्दीत त्यांना विविध पुरस्कार, सन्मान आणि उपाध्या देऊन भूषविण्यात आले आहे. परंतु एक पदवी त्यांना मिळता मिळता राहिली. त्याचे झाले असे की, कोलकाता येथील रवींद्र भारती विश्वविद्यालयाकडून (आरबीयू) बिग बी यांना डी. लिट पदवी दिली जाणार होती. मात्र ऐनवेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांनी बिग बींना ही पदवी देण्यास नकार दिला. त्यांनी डी.लिट मिळविणाºया यादीतून बिग बीचे नाव काढून टाकले. न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, कुलपती सब्यसाची बसू राय चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली. चौधरी यांनी म्हटले की, राज्यपाल यांनी विश्वविद्यालयात अनुपस्थित राहणाºया कोण्याही व्यक्तीला ही मानद उपाधी दिली जाऊ नये, असे सांगितले आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी ‘१०२ नॉट आउट’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत ऋषी कपूर बघावयास मिळणार आहेत. न्यू एजन्सीनुसार कुलपती यांनी म्हटले की, ‘बच्चन यांनी सुरुवातीला सांगितले होते की, शूटिंगसंबंधी आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ८ मे रोजी विश्वविद्यालयात होणाºया ४३ व्या दीक्षांत समारंभात मी डी.लिट उपाधी ग्रहन करण्यासाठी उपस्थित राहू शकणार नाही. कुलपती यांनी म्हटले की, ‘या समारंभात लेखक नबनिता देव सेन, चित्रकार जतिन दास आणि शास्त्रीय गायक पंडित अमिया रंजन बंडोपाध्याय यांना ही मानद उपाधी दिली जाणार आहे. हा दीक्षांत समारंभ आरबीयूच्या जोरासंको कॅम्पसमध्ये होणार आहे. चौधरी यांनी सांगिंतले की, प्रसिद्ध चित्रकार राबिन मंडल यांना हिराचंद दुगार मेमोरियल अवॉर्ड तथा गायक रूमा गुहा ठाकुरता आणि मूर्तिकार निरंजन प्रधान यांना पश्चिम बंगाल राज्य अकॅडमी आॅफ डान्स ड्रामा म्युझिक तथा व्हिजजुअल आटर््स पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. नृत्यांगना पूर्णिमा घोष आणि नाट्य क्षेत्रासाठी पंकज कुमार मुंश यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.