Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अमिताभ बच्चन यांना हवे काम!! दीपिका, कॅटरिनाकडे केला अर्ज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 11:39 IST

महानायक अमिताभ बच्चन यांना काम हवे आहे. होय, वाचतायं ते खरं आहे. अमिताभ यांना काम हवे आहे. सोशल मीडियावर ...

महानायक अमिताभ बच्चन यांना काम हवे आहे. होय, वाचतायं ते खरं आहे. अमिताभ यांना काम हवे आहे. सोशल मीडियावर त्यांनी जाहिरपणे काम मागितले आहे. खरे तर ७६ वर्षांच्या अमिताभ यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’,‘१०२ नॉट आऊट’ असे एक ना अनेक चित्रपट त्यांच्याकडे आहेत. मग तरिही बिग बींनी सोशल मीडियावर काम का मागावे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हीच तर खरी गंमत आहे. अमिताभ यांना दुस-या कुणाकडून नाही तर दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ यांच्याकडून काम हवे आहे. बिग बींनी इन्स्टाग्रामवर एका वृत्तपत्रातील एक बातमीचे कात्रण शेअर करत, दीपिका व कॅटकडे जॉब अप्लिकेशन केली आहे. या जॉब अप्लिकेशनसोबत बिग बींनी स्वत:चा अख्खा बायोडाटाही शेअर केला आहे. ‘जन्म तारीख- 11.10.1942.. उम्र-76, फिल्मों में 49 साल का एक्सपीरियंस.. लगभग 200 फिल्मों में एक्टिंग की है.. हिंदी बोल लेता हूं. हाइट- 6'2.. उपलब्ध हूं. आपको कभी भी हाइट की समस्या नहीं होगी...’ असे या बायोडाटात लिहिलेले आहे...आता हा सगळा काय मामला आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. अमिताभ यांनी ज्या बातमीचे कात्रण पोस्ट केले आहे, ती बातमी आहे, दीपिका व कॅटच्या उंचीबद्दलची. डीपी व कॅटची उंची शाहिद कपूर व आमिर खानपेक्षा अधिक आहे, अशी ही बातमी आहे. याच बातमीवरून अमिताभ यांनी ‘गुगली’ टाकली आहे. ‘आपको कभी भी हाइट की समस्या नहीं होगी...’, हे त्यांच्या बायोडाटातील वाक्य हीच ती ‘गुगली’ आहे....अमिताभ यांच्या या विनोदी पोस्टवर चाहत्यांनी तितक्याच मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.  अमिताभ व दीपिकाने शुजीत सरकार यांच्या ‘पीकू’मध्ये एकत्र काम केले आहे. लवकरच अमिताभ कॅटरिनासोबतही दिसणार आहेत. होय, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये कॅटरिनाही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.ALSO READ : 49 years of Amitabh Bachchan : ​ बहुतेरे दाग छिड़काए गए बरसों मुझ पर...! अमिताभ बच्चन यांचे टीकाकारांना असेही उत्तर!