Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाहत्याने केला अमिताभ बच्चनच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 14:32 IST

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील बंगल्यात एका चाहत्याने घुसण्याचा प्रयत्न केला. बुलेट बनवारीलाल यादव असं या 25 वर्षीय ...

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील बंगल्यात एका चाहत्याने घुसण्याचा प्रयत्न केला. बुलेट बनवारीलाल यादव असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. बुलेट यादवने बंगल्याच्या भिंतीवरुन घरात घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी वेळीच बुलेट यादवला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. बुलेट यादव हा मूळचा बिहारचा असून, सध्या पुण्यात राहत असल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे. अमिताभ बच्चन यांना गाणं ऐकविण्यासाठी बंगल्यात शिरल्याचं त्याने  पोलिसांना सांगितलं आहे. दुपारी एक ते दोनच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर सुरक्षारक्षकांनी याबाबत पोलिसांना कळविले. बुलेट यादवला अटक करून नंतर जामीनावर सोडून देण्यात आले. मात्र या घटनेमुळे अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.