Join us

अमिताभ बच्चन यांनी रिक्षातून केला प्रवास, चाहतेही झाले थक्क!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 14:52 IST

लखनौच्या रस्त्यावरचा अमिताभ बच्चन यांचा एक फोटो सध्या व्हायरल होतो. या फोटोत  ते रिक्षातून प्रवास करताना दिसत आहेत.

ठळक मुद्दे  ‘गुलाबो सिताबो’ या सिनेमात अमिताभ यांच्यासोबत आयुष्मान खुरानासुद्धा दिसणार आहे

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आपल्या भूमिकांनी अनेकदा चाहत्यांना थक्क करतात. सध्या अमिताभ ‘गुलाबो सिताबो’च्या शूटींगमध्ये बिझी आहेत. या चित्रपटातील त्यांच्या लुक्सची चांगलीच चर्चा आहे. या  या चित्रपटात बिग बी एका वृद्धाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.  तूर्तास लखनौच्या रस्त्यावरचा  त्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होतो. या फोटोत  ते रिक्षातून प्रवास करताना दिसत आहेत. रिक्षातील ही व्यक्ती अमिताभ आहे, हे ओळखताही येणार नाही, इतका मेकअपने त्यांचा चेहरापालट केला गेलेला आहे.

शूटींगदरम्यान कधी चारबाग बस स्टँडवर फिरताना तर कधी रिक्षात प्रवास करताना अमिताभ यांचे अनेक शॉट घेण्यात आलेत. सिटी स्टेशनजवळही ते फिरताना दिसले. चाहते त्यांचे लुक्स पाहून थक्क झालेत.

 अमिताभ यांनी आपल्या लुक्सचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या मेकअपसाठी रोज ३ तास लागतात, असे त्यांनी लिहिले आहे. यापूर्वी ‘पा’ चित्रपटासाठी बच्चन यांचा गेटअप पूर्णपणे बदलण्यात आला होता त्यानंतर ब-याच वर्षांनी बच्चन हे वेगळ्या रूपात दिसत आहेत. बच्चन यांचे आगळेवेगळे  रुप पाहून फॅनही आश्चर्यचकित झाले आहेत. 

‘गुलाबो सिताबो’ या सिनेमात अमिताभ यांच्यासोबत आयुष्मान खुरानासुद्धा दिसणार आहे. हा सिनेमा 24 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाची कथा जुही चतुर्वेदीने लिहिली आहे तर रॉनी लहरी आणि शीला कुमार सिनेमाची निर्मिती करणार आहेत. शूजीत सरकार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.  ‘गुलाबो सिताबो’व्यतिरिक्त ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘चेहरे’ या चित्रपटातही अमिताभ महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसतील.

टॅग्स :अमिताभ बच्चन