Join us

श्रीदेवीसोबतच्या आठवणींना अमिताभ बच्चन यांनी दिला उजाळा, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 17:47 IST

अमिताभ बच्चन व श्रीदेवी यांनी एकत्र बऱ्याच सिनेमात काम केले आहे. श्रीदेवीसोबतच्या आठवणींना उजाळा देत अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसोबत बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. या जोडीला रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असून या फोटोत अमिताभ बच्चन यांच्यासोबत श्रीदेवी, सलमान खान व आमीर खानदेखील दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, लंडन वेम्बले स्टेडिअममध्ये माझा पहिला कॉन्सर्ट होता. त्यावेळी माझ्यासोबत श्रीदेवी, आमीर खान व सलमान खान या कॉन्सर्टसाठी आले होते. सत्तर हजार लोक उपस्थित होते. ऐतिहासिक आहे वेम्बले स्टेडिअमची झलक. 

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. अमिताभ बच्चन सध्या नागराज मंजुळेच्या झुंड चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. त्यांनी या चित्रपटाच्या सेटवरील बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. झुंड या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे करत आहेत. हा नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व नागराज मंजुळे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चनसलमान खानआमिर खान